epranali

This is educational blog.

Res

Breaking news

रविवार, १९ सप्टेंबर, २०२१

मानव सेवा हाच धर्म

          'मानव सेवा हाच धर्म'



         असाच एक रविवार होता. दीन बंधू एंड्रयूज यांच्या निवासस्थानी एक ख्रिश्चन व्यक्ती सकाळी-सकाळीच अवतरली. उभयतात बराच वेळ बोलणं झालं. एंड्रयूज ने आपल्या मनगटी घड्याळाकडे पाहिले. 'मला चलायला हवं', असं त्यांनी पाहुण्याला 'चर्चमध्ये चलायचं ना?' आज रविवार आहे, तेव्हा आपण दोघे चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जाऊया, पाहुण्याने म्हटले. 'हो तर, आपणास चर्चमध्ये जायचे आहेच. तर चला सोबत म्हणून' दोघेजण घराबाहेर पडले. रस्त्यावर आल्यावर दीनबंधू एंड्रयूजने पाहुण्याला आपल्या सोबत येणार का विचारले. 'आपण तर चर्चमध्ये चाललोय ना ?' पाहुणा उद्गारला. होय, आपण तिकडेच जातोय, एंड्रयूज म्हणाले. दोघे चालत चालत एका झोपडपट्टीत आले. इकडे कोठे चर्च आहे? पाहुण्याने प्रश्न केला. आपण चर्चमध्येच तर जातोय, असे एंड्रयूज पुन्हा एकदा म्हणाले. एंड्रयूज एका झोपडीत घुसले, त्यांच्यासोबत पाहुणाही. या झोपडपट्टीत एक वयस्कर व्यक्ती एका लहान मुलाला पंख्याने हवा करीत होता. मुलगा बराच आजारी होता. या वयस्कर व्यक्तीशिवाय त्या मुलाकडे आपुलकीने पाहणारा कोणीच नव्हता. एंड्रयूजने वयस्कर व्यक्तीकडून पंखा घेतला व ते स्वतः त्या बालकाची सेवा करू लागले. त्यांनी या वयस्कर व्यक्तीला आपल्या कामावर जाण्यास सांगितले. एंड्रयूजसोबत असलेल्या पाहुण्याला यातलं काहीच कळेना. चर्चची प्रार्थना सोडून आपण कोठे येऊन फसलो, असे त्याला झाले. एंड्रयूज पुढे होऊन म्हणाले, "हा मुलगा बऱ्याच दिवसापासून आजारी आहे. वडिलाशिवाय या मुलाच्या सेवेसाठी दुसरा कोणी नाहीए. या मुलाच्या वडिलांना वेळेवर दररोज कामावर जावे लागते. वडील कामावर गेले नाही तर दोघे उपाशी मरतील. तेव्हा याचे वडील घरी येईपर्यंत मीच या मुलाची सेवा करतो. या मुलाची सेवा म्हणजेच माझ्यासाठी चर्चची प्रार्थना आहे, असे मी मानतो," एंड्रयूज शेवटी म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा