epranali

This is educational blog.

Res

Breaking news

रविवार, १९ सप्टेंबर, २०२१

संतांंचा उपदेश

              संतांचा उपदेश



 एका चोराचा मृत्यूकाळ जवळ आला. त्याने आपल्या मुलाला चोरी कशी करायची याची सारी कला शिकविली. जाता जाता त्याने मुलाला सांगितले की, 'तू चुकूनही कोणत्या संताचा उपदेश ऐकू नको. जर अशी वेळ आलीच तर दोन्ही कानामध्ये आपली बोटे टाकशील,' त्यानंतर चोराने आपले शरीर सोडले. चोराचा मुलगा चोरी करण्याची कला अंमलात आणू लागला. मोठ्या मोठ्या चोया करण्यात तो वाकबगार झाला. एकदा रस्त्याने जात असता एका झाडाखाली एक संत लोकांना उपदेश देत असताना त्याला दिसला. त्याला पाहून चोर कानात बोटे घालून पळू लागला. अचानक ठोकर लागून तो खाली पडला. त्याची हाताची बोटे कानातून निघाली. कान मोकळे झालेत. तेव्हा संताचे वाक्य त्याला ऐकू आले की, 'मनुष्यांच्या शरीराची सावली पडते, परंतु देवतांच्या शरीराची सावली कधी पडत नाही. काही दिवसानंतर त्याने एक मोठी चोरी केली. एका | पोलिसाला त्याच्यावर शंका आली. चोर चोरी कबूल करणार नाही म्हणून पोलिस देवतांचा ड्रेस घालून चोराच्या घरी गेला. त्याला बोलावून म्हटले, 'तू इतकी मोठी चोरी केली, परंतु मला भेट चढविली नाहीस.' चोर देवतांच्या पाया पडला. तेव्हा त्याची नजर त्याच्या सावलीवर गेली. त्याला संताचा उपदेश आठवला की, देवतांची सावली कधी पडत नाही ! त्याने मनातल्या मनात विचार केला की हा काही खरा देव नाही दुसराच कोणीतरी आहे. त्याने उभे होऊन म्हटले. 'कोणती चोरी? कोणती भेट? मी कोणती चोरी केलेली नाही.' तेव्हा देवता स्वरूप धारण केलेला पोलीस बुचकाळ्यात पडला. तो चुपचाप तेथून निघून गेला. त्यानंतर चोराने संताच्या उपदेशाच्या एका वाकाने माझं इतकं भले झाले तर मी त्यांचा पूर्ण उपदेशच ऐकला  असता तर माझं जीवनच बदलून गेलं असतं. तो चोर संताजवळ जावून विनंती करू लागला की, मला आपले उर्वरित आयुष्य चोरीचा धंदा सोडून आपल्या सेवेत घालवायचे आहे. मला तशी संधी द्या. आपल्या सेवेने मी माझ्या पापाचे प्रायश्चित करू शकेन. संताने त्याच्या विनंतीला स्वीकारून त्याला दीक्षा देण्याचे मान्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा