epranali

This is educational blog.

Res

Breaking news

रविवार, १९ सप्टेंबर, २०२१

मनुष्याचे कर्तृत्व श्रेष्ठ

           'मनुष्याचे कर्तृत्व श्रेष्ठ'




              एकदा गप्पा मारता मारता बादशहाने बिरबलाला एक प्रश्न विचारला, “बिरबला! मनुष्याचे कर्तृत्व श्रेष्ठ की निसर्गाचे कर्तृत्व श्रेष्ठ असते?” “जहाँपनाह ! कधी कधी निसर्गापेक्षाही मनुष्याचे कर्तृत्व जास्त श्रेष्ठ असते. त्याचीच किंमत जास्त ठरू शकते !” “तू हे सिध्द करून दाखव, तरच मी मान्य करेन !” बादशहा म्हणाला. बादशहाच्या म्हणण्याप्रमाणे बिरबलने एका कुशल शिल्पकाराला संगमवराचा सुरेख पुष्पगुच्छ बनवायला सांगितले, पुष्पगुच्छ तयार होताच शिल्पकाराने तो बादशहाला अर्पण करण्यासाठी दरबारात आणला. संगमरवरी दगडाचा, गुलाबाच्या गुच्छासारखा दिसणारा सुंदर पुष्पगुच्छ बघून बादशाहाला आनंद झाला. त्याने खूष होऊन शिल्पकाराला पुष्पगुच्छाबद्दल शंभर मोहरा, आणि वर पन्नास मोहरा बक्षिस दिल्या. त्याच्या दुस-याच दिवशी बिरबलाच्या सांगण्याप्रमाणे बागेतील माळ्याने खन्या गुलाबाचा एक गुच्छ करून दरबारात आणला आणि बादशहाला अर्पण केला बादशहाने तो गुच्छ हातात घेऊन एकवार त्याचा वास घेतला अन् खजिनदाराला सांगितले 'याला पाच मोहरा बक्षीस म्हणून द्या !' बादशहाने असे म्हणताच बिरबल समोर आला अन् म्हणाला, 'जहाँपनाह! माळ्याने निसर्गाने निर्माण केलेली फुलं आणली तरी त्याला पाचच मोहरा अन् दगडाच पुष्पगुच्छाला मात्र आपण दीडशे मोहरा दिल्यात. निसर्ग कर्तृत्वापेक्षा मनुष्याच्या कर्तृत्वाला कधी-कधी जास्त किंमत असते हे यावरून आपण आपल्या कृत्याने सिध्द करून दिलं आहे, नाही का ?' या बिरबलाच्या बोलण्यावर | बादशहा निरूत्तर झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा