epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन

    २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन


 

        प्रजासत्ताक म्हणजे लोकशाही, लोकानी लोकासाठी चालविलेले लोकांचे राज्य. २६ जानेवारी १९५० रोजी भारत हे जगातील सर्वात मोठे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वांतत्र्य मिळाले. पं. जवाहरलाल नेहरूंचे मंत्रिमंडळ स्वतंत्र भारताचा राज्यकारभार पाहू लागले तरी राज्यव्यवस्थेचा साचा इंग्रजांनी पूर्वापार ठरवून दिलेला होता व त्यानुसारच देशाचा | राज्यकारभार या मंत्रिमंडळाला पहावा लागत होता कारण आपल्या देशाची राज्यघटना अद्याप तयार झालेली नव्हती. ९ डिसेंबर १९४६ रोजी आपल्या घटना परिषदेचे उद्घाटन झाले आणि घटना तयार करण्य काम सुरु झाले. २६ नोव्हेंबर १९५० पासून आपल्या देशाच्या या स्वतंत्र राज्यघटनेप्रमाणे देशाचा राज्यकारभार आपले केंद्रीय मंत्रिमंडळ पाहू लागले. त्या दिवशी अखेरचे गव्हर्नर जनरल श्री चक्रवर्ती राज गोपालचारी यांनी सकाळी १० वा. १८ मि. नी भारत हे संपूर्ण स्वतंत्र व प्रजासत्ताक गणराज्य झाल्याचे जाहीर केले. त्यावेळी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी राष्ट्रपतीपदाची | शपथ घेतली. त्यांना एकवीस तोफांची सलामी देण्यात आली. भारतीय जनतेचे भारतीय जनतेसाठी भारतीय जनतेच्या निर्वाचित प्रतिनिधींनी चालविलेले स्वतंत्र गणराज्य त्यावेळी अस्तित्वात आले. २६ जोनवारी या दिवसाला आपल्या देशाच्या स्वांतत्र्यलढ्यात ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे. डिसेंबर १९२९ मध्ये काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात पं. जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाला होता. आणि त्या ठरावानुसार २६ जानेवारी १९३० रोजी (आपण परतंत्र असलो तरी) देशभर पहिला स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून २६ जानेवारी १९४७ पर्यंत दरवर्षी या दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दरवर्षी १५ ऑगस्ट या दिवशी 'स्वातंत्र्यदिन' व २६ जानेवारी या दिवशी 'प्रजासत्ताकदिन' साजरा होऊ लागला. हे दोन्ही दिवस राष्ट्रीय सण आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा