epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

सामान्य ज्ञान-10

सामान्यज्ञानावर आधारित प्रश्नोत्तरे.



१) सजीवांचे दोन गट कोणते?

उत्तर - प्राणी आणि वनस्पती .


२) सजीवांना कशाची गरज असते?

उत्तर - अन्न, पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश.


३) पाठीचा कणा असलेल्या सजीवांना काय म्हणतात ?

उत्तर  -  पृष्ठवंशीय सजीव उदा.(जलचर, पक्षीवर्ग,  सरपटणारे, सस्तन प्राणी.


४) पाठीचा कणा नसलेल्या सजीवांना काय म्हणतात?

उत्तर  - अपृष्ठवंशीय सजीव- उदा.(गोगलगाय)


५) सजीवांची लक्षणे कोणकोणती आहेत ?

उत्तर  - वाढ, श्वसन, उत्सर्जन ,प्रजनन, चेतनाक्षमता ,हालचाल, ठराविक आयुर्मान ,पेशीमय रचना.*


६) वाढ होत नाही त्यांना काय म्हणतात ?

उत्तर  - निर्जीव


७) निर्जीवांना कशाची गरज नसते?

उत्तर - अन्न, पाणी ,हवा यांची गरज नसते,


८) सजीवांची वाढ होण्यासाठी कोणत्या घटकांची गरज असते?

उत्तर - निर्जिव


9)एकपेशीय सजीवांची  दोन नावे सांगा?

उत्तर  -  अमीबा , पॕरोमेशिअम


१०) बहुपेशीय सजीवांची नावे  सांगा?* 

उत्तर - मानव , वडाचे झाड , कांद्याचे रोप, गाय, उंदिर, झुरळ, हत्ती इत्यादी.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा