epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शनिवार, १५ जून, २०२४

7 जून विज्ञान दिनविशेष (भारतीय रेडक्रॉस दिन)

 ७ जून (भारतीय रेडक्रॉस दिन) 



१८११ : 'क्लोरोफॉर्मचे जनक' स्कॉटिश वैद्यकशास्त्रज्ञ सर जेम्स यंग सिंप्सन यांचा जन्म (मृत्यू: ६ मे)  एडवर्ड 

१८६२ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ फिलिप एडवर्ड अॅन्टान-लेनॉर्ड यांचा जन्म (मृत्यू: २० मे)

 १८७७ नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ चार्ल्स ग्लोव्हर बारकला यांचा जन्म (मृत्यू: २३ ऑक्टोबर)

 १८९६ : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट सॅडर्सन मल्लीकेन यांचा जन्म यांना 'केमिकल बॉण्डस् अॅण्ड द इलेक्ट्रानिक स्ट्रक्चर ऑफ मॉलेक्यूल्स बाय् द मॉलेक्यूलर ऑरिबिटल मेथड' या संशोधन कार्याबद्दल १९६६ सालाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. 

 १९३२ : अमेरिकन शल्यकर्मज्ञ विल्यम कीन् यांचे निधन यांनी नैसर्गिक दाढेच्या जागी रबराच्या दाढेचे रोपण करण्यात यश मिळविले. या शल्य कौशल्यामुळे यांची युरोपभर कीर्ती पसरली (जन्म: १९ जानेवारी)

 १९७८: सुप्रसिद्ध ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ रोनॉल्ड जॉर्ज ब्रेफोर्ड नॉरिश यांचे निधन यांनी फ्लॅशफोटोलिसीस आणि कायनेटिक स्पेक्ट्रोस्कोपी यासंबंधी संशोधन केले. यांना 'रिअॅक्शन कागनेटिक्स आणि फोटोकेमिकल रिअॅक्शन्स' या संशोधन कार्याबद्दल १९६७ सालाचे रसायनशास्त्राचे नोबल पारितोषिक मिळाले. (जन्म: ९ नोव्हें.) 

१९९२ पर्यावरण संरक्षण विषयक जागतिक पातळीवरील पहिली वसुंधरा परिषद ब्राझिल मधील रिओडी जानिरो येथे सुरु.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा