१४ जून
★१७४६: स्कॉटिश गणितशास्त्रज्ञ कॉलिन मॅक्लॉरिन यांचे निधन यानी न्यूटनच्या गणितासंबंधी महत्त्वाचे संशोधन केले.
★१८३२ 'ऑटो इंजिनचे जनक' निकोलस ऑगस्ट ऑटो यांचा जन्म (मृत्यू: २६ जानेवारी)
★१८६८ : 'मानवी रक्तगटाचे जनक' नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन आस्ट्रियन शरीरशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टेनर यांचा जन्म. यांच्या संशोधनामुळे पुढे रक्तपेढींची सुरुवात झाली. (मृत्यू: २६ जून)
★१८८०: प्रसिद्ध भारतीय ग्रामीण शास्त्रज्ञ सतिशचंद्र दासगुप्ता यांचा जन्म (मृत्यू: २४ डिसेंबर)
★१९०३ : उत्क्रांतिवादाचा थोर पुरस्कर्ता जर्मन शरीरशास्त्रज्ञ कार्ल गॅगेनबावर यांचे निधन यांनी गर्भविज्ञानशास्त्रात मोलाचे संशोधन केले (जन्म: २१ ऑगस्ट)
★१९२४ नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश वैद्यकशास्त्रज्ञ सर जेम्स ब्लॅक यांचा जन्म यांनी विविध रोगांवर प्रभावी औषधांचा शोध लावला. मज्जातंतूच्या पेशीसंबंधी मौलिक संशोधन केले. यांना 'द डिस्कव्हरीज ऑफ इम्पॉर्टट प्रिन्सिपल्स फॉर ड्रग ट्रिटमेंट' या संशोधन कार्याबद्दल १९८८ सालाचे वैद्यकशास्त्राचे नोवेल पारितोषिक विभागून मिळाले.
★ १९४६ 'दूरचित्रवाणी चे जनक' स्कॉटिश संशोधक जॉन लॉगी बेअर्ड यांचे निधन यानी सन १९२५ रोजी दूरचित्रवाणीचे प्रात्यक्षिक सर्वांना दाखविले, सन १९२९ मध्ये जर्मनी व लंडन दरम्यान दूरचित्रवाणीची व्यवस्था सुरु झाली यांच्या संशोधनामुळे करमणूक क्षेत्रात क्रांती घडून आली. आधुनिक युगात दूरचित्रवाणी एक मुख्य करमणुकीचे आणि लोक जागृतीचे साधन बनले आहे. (जन्म १३ ऑगस्ट) ★१९१४ भारतीय बनावटीचा अत्याधुनिक रणगाडा भारतीय युद्धसेनेत दाखल .
★१९६३ सोवियत रशियाचे व्होस्टोक ५ अंतराळवीर व्हॅलेरी बिकोव्हस्की यांचे सह अवकाशात प्रक्षेपित केले ५ दिवसात ८१ पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून १९ जून रोजी पृथ्वीवर सुखरूप परत आले .
★१९८६ भारतातील पहिल्या टेस्टट्यूब बेबीचा जन्म.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा