25 जून-विज्ञान दिनविशेष
★१८६४ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्टर हरमन नर्स्ट यांचा जन्म (मृत्यू: १८ नोव्हेंबर)
★१९०५ : जर्मन खगोलशास्त्रज्ञ रूपार्ट विल्ट यांचा जन्म यांनी बहुतेक ग्रहाच्या भोवती असणाऱ्या वातावरणात हायड्रोजन आणि हेलिअम असल्याचे सिद्ध केले.
★१९०७ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ जे हन्स डॅनिअल जिन्सन यांचा जन्म. (मृत्यू. ११ फेब्रुवारी)
★१९११: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ विलियम स्टेन यांचा जन्म. यांनी मॉल्यूक्यूलर स्ट्रक्चर ऑफ प्रोटिन्स या संबंधी महत्त्वाचे संशोधन केले. यांना 'अंडरस्टैंडिंग ऑफ द कनेक्शन बिटविन केमिकल स्ट्रक्चर अॅण्ड कॅटलिटिक अॅक्टिव्हिटी ऑफ द अॅक्टिव्ह सेंटर रिबोन्यूक्लिज मॉलूक्यूल' या संशोधन कार्याबद्दल १९७२ सालाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.
★१९३९ : ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर फ्रैंक वॅटसन डॉयसॉन यांचे निधन. हा रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा सचिव होता. अस्ट्रॉनॉमर रॉयल म्हणून स्काटलंडने यांचा बहुमान केला (जन्म: ८ जानेवारी)
★१९६२: ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ हर्बर्ट ब्रेर्टन बेकर यांचा जन्म (मृत्यू २७ एप्रिल)
★१९९५ सुप्रसिद्ध आयरिश पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ अर्नेस्ट थॉमस सिंटॉन वाल्टन यांचे निधन यानी लिथियम वर प्रोटॉनचा मारा करून लिथिअमचा न्यूक्लिअस दुभंगण्याचा प्रयत्न केला यांना 'द पायोनिअर वर्क ऑन द ट्रान्सम्यूशन ऑफ अॅटोमिक न्यूक्लि बाय आर्टिफिशीयल अॅक्सिलरेटेड अॅटोमिक पार्टीकल्स' या संशोधन कार्याबद्दल १९५१ सालाचे पदार्थविज्ञान शास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले (जन्म ६ ऑक्टोबर)
★१९९७ : 'स्कूबा डायव्हिंग किंवा अॅक्वालांग (पाण्याखाली श्वासोच्छवासास मदत करणारी यंत्रणा) चे जनक' जॅक्विस कौस्तेयू यांचे निधन. अक्वालंगमुळे पाण्याखालील संशोधनात अभूतपूर्व क्रांती झाली. कॉस्तेयूं यांनी शार्क, डॉल्फिन, व्हेल वगैरे जलचर प्राण्याचे संशोधन करून अनेक व्हिडिओफिल्म्स बनविल्या यांनी सन १९७४ मध्ये जलचर जीवाच्या सुरक्षिततेसाठी कौस्तेयू सोसायटी स्थापन केली.
★१८७६ अलेक्झांडर ग्रहम बेल यांनी अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे भरलेल्या शतसांवत्सरिक प्रदर्शनामध्ये आपल्या दूरध्वनीचे प्रात्यक्षिक सादर केले
★१९९७ 'मीर' अवकाश स्थानकाला सामान पुरवठा करणारे प्रोग्रेस-एम हे अवकाशयान मीरला जोडलेल्या स्पेक्टर नावाच्या मोडयूलला जाऊन धडकले. या अपघातातून मीर बचावले खरे पण तो त्यांना शेवटचाच धक्का ठरला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा