26 जून-विज्ञान दिनविशेष
★ २६ जून (जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन) १८२४ : 'तापमान मापनपद्धतीचा जनक' विल्यम् केल्विन यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर)
★१९४३ : सुप्रसिद्ध अमेरिकन ऑस्ट्रियन शरीरशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टेनर यांचे प्रयोगशाळेत संशोधनामध्ये मग्न असतांना निधन. यांनी मानवी रक्ताचे चार गट पाडले. यांना 'द डिस्कव्हरी ऑफ ह्यूमन ब्लड गुप्स' या संशोधन कार्याबद्दल १९३० सालाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. यामधूनच पुढे रक्तपेढ्यांची मुहूर्तमेढ रोवली गेली. (जन्म: १४ जून)
★१९९३ नॅव्हस्टार या मालिकेतील २४ वा उपग्रह आकाशात प्रक्षेपित करून अमेरिकेने पृथ्वीवरील स्थाननिश्चिती करणारी यंत्रणा पूर्ण केली. ग्राऊंड पोझिशनिंग सिस्टिम असे या प्रणालीचे नाव आहे. जीपीएस या नावाने ही यंत्रणा ओळखली जाते.
★२००० रोजी 'ह्यूमोन जिनोम प्रकल्प' यशस्वी होवून मानवाच्या जनुकीय कुंडलीचा आराखडा तयार झाला या प्रकल्पात विविध देशातील अकराशेहून जास्त शास्त्रज्ञांनी अहोरात्र संशोधन केले. हा प्रकल्प यशस्वी होण्यास १३ वर्षे लागली. अपेक्षेपेक्षा दोन वर्ष अगोदर हा प्रकल्प पूर्ण झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा