epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

जिजाऊ वंदना

                जिजाऊ वंदना 



जिजा माऊली गे वंदितो मी,

 जिजाऊच लक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥ 

तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही, 

तुझ्या साऊली हीन कोणीही नाही; 

नसे दास कोणी नसे राव - स्वामी ॥ 

जिजा माऊली गे..... 

तुझ्या धाडसाचे धडे हे आम्हाला, 

तुझ्या विचारांचे धडे सोबतीला;

 तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥ जिजा माऊली गे......

 तुझी सावली सर्व काळभ असू दे, 

कुठे दुःख कोणास काही नसू दे; 

नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥ 

जिजा माऊली गे..... 

तुझ्या प्रेरणेने घडो लोकसेवा, 

तुझ्या चिंतनाने सुखी काळ व्हावा; 

घडो अंत तो शांत साफल्यगामी ॥ 

जिजा माऊली गे.... जय जय जिजाऊ Sss - जिजाऊ 

- प्रा. अशोक राणा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा