epranali

This is educational blog.

Res

Breaking news

सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

असो तुला देवा माझा सदा नमस्कार

  असो तुला देवा माझा, सदा नमस्कार 



 असो तुला देवा माझा सदा नमस्कार 

तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार ।।धृ० ॥ 

तुझ्या कृपेने रे होतील, 

फुले पत्थराची तुझ्या कृपेने रे होतिल, मोति मृत्तिकेची

 तुझ्या कृपेने रे होतिल सर्प रम्य हार ॥१॥

 तुझ्या कृपेने रे होई उषा त्या निशेची 

तुझ्या कृपेने रे होईल सुधा त्या विषाची

 तुझ्या कृपेने रे होईल पंगु सिंधु पार ॥ २ ॥

 तुझ्या कृपासिंधूमधला बिंदु जरि मिळेल

 तरी प्रभो शतजन्माची मम तृषा शमेल 

तुझा म्हणूनि आलो देवा बघत बघत दार ॥३॥

 साने गुरुजी 

********************************


 ईश प्रार्थना

 सृष्टिकर्ता ईश प्यारे, एक हो तुम एक हो 

रूप रखकर भी अनेकों, एक हो तुम एक हो ॥धृ० ॥ तुम हो अल्ला, तुम हो ईसा, बुद्ध, अहुरा हो तुम्ही ।

 तुम हो शकर, तुम हो विष्णु, राम कृष्ण हो तुम्ही ॥ १ ॥ 

वेदोंने जो तुमको गाया, बायबल ने तुम को पाया।

 कुरान में भी तुम्हारी छाया, एक हो तुम एक हो ॥२॥

 मंदिरों में तुमको देखा, मस्जिदों में तुमको देखा ।

 गिरिजों में भी तुमको देखा, एक हो तुम एक हो ॥३॥

 जो न आपस में हैं लड़ते, सबको भाई जो हैं कहते।

 वे ही सच्चे हैं तुम्हारे, एक हो तुम एक हो ॥४॥ 

महाकवी इकबाल

********************************

  सत्य - शिव सुंदरम् - 

ॐ नमो उषःकाल सुस्वागतम् । सत्यं शिवं, सुंदरम् ॥धृ॥ 

 नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम् शिवम् सुंदरा ॥ १ ॥ 

शब्द रूप शक्ति दे भावरूप भक्ति दे। 

प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा ॥२॥

 विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास ।

 नाव नेई पैलतीरी दयासागरा ॥ ३ ॥

 होऊ आम्ही नितीगत कलागुणी बुद्धिमत । 

किर्तीचा कळसा जाय, ऊंच अंतरा ॥२॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा