epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

नव महाराष्ट्र गीत

 नव महाराष्ट्र गीत



 बदलवून टाकू अपुला महाराष्ट्र सारा, 

वर्षवू इथे घामाच्या अहोरात्र धारा ! 

ह्याच कातळांना आणू 

कळा सोनियाची, 

ह्याच माळरानी काढू 

पिके मोतियांची;

भुकेल्यास भाकर देऊ, अनाथां निवारा 

 चालवून गिरणी मधला 

एक एक साचा 

आम्ही पुन्हा हाती घेऊ 

हात भविष्याचा ! 

उद्याच्या यशाने केला आमुचा पुकारा ! 

आम्हावरी खिळले डोळे 

आज स्वप्न बघतो आम्ही

 उद्याची दिसाचे 

आता कुठे इतिहासाचा समजलो इशारा ! 

माय कोयनेची माया

 बळ आम्हास देई; 

गावा गावा गहिवरलेले 

तिचे नाम घेई

मराठी धरेला फुटेला विजयांचा धुमारा

  घरोघरी स्वातंत्र्याचा

 पांडूरंग आला, 

महाराष्ट्र भेटीसाठी पुंडलीक झाला, 

विटेवर आम्ही ठेवू जागता पहारा !

- सुरेश भट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा