epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

खरा तो एकचि धर्म

 आई माझा गुरू 



आई माझा गुरू, आई कल्पतरू, सुखाचा सागरू, आई माझी ! 

प्रीतीचे माहेर, शांतीचे आगर, मांगल्याचे सार, आई माझी ! 

साने गुरुजी *

★●★●★●★●★●★●★●★●★●★●

 देवा तुझे किती सुंदर आकाश 

देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो ॥ध्रु.॥

 सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर, पडे त्यांचें ॥ १ ॥ 

सुंदर ही झाडें, सुंदर पाखरें, किती गोड बरे, गार्णे गाती ॥२॥ 

सुंदर वलीची, सुंदर ही फुलें, तशी आम्ही मुर्ले, देवा तुझी ॥३॥ 

★●★●★●★●★●★●★●★●★●★●★

खरा तो एकचि धर्म 

खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ॥ धृ.॥

 जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित

 तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे ॥१॥

 सदा जे आर्त अति विकळ, जयांना गांजनी सकळ 

तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे ॥२॥

 कुणा ना व्यर्थ हिणवावे, कुणा ना व्यर्थ शिणवावे, 

समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे ॥३॥ 

प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी, 

कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे ॥४॥

 असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, 

परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे ॥५॥ 

साने गुरुजी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा