epranali

This is educational blog.

Res

Breaking news

बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२

शूर आम्ही सरदार

 शूर आम्ही सरदार 

शूर आम्ही सरदार आम्हाला, काय कुणाची भीती। देव, देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती।।धृ।। 

आईच्या गर्भात उमगली, झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागलं जडली वेडी प्रीत 

लाख संकटे झेलून घेईल, अशी पहाडी छाती ॥१॥

 जिंकावं वा लढून मरावं, हेच आम्हाला ठावं लढून मरावं मरून जगावं, हेच आम्हाला ठावं । देशापायी सारी विसरू, माया ममता नाती ॥२॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा