Number - वचन |
Singular Number -एकवचन |
ज्या नामातून फक्त एकाच घटकाचा बोध होत असेल, असे नाम एकवचनी असते.Eg. boy, girl, book, pen, city, etc
Plural Number - अनेकवचन |
नामातून एकापेक्षा अधिक घटकांचा बोध होत असेल तर असे नाम अनेकवचनी असते. Eg. boys, girls, books, pens, cities etc.
खालील पद्धतींनी अनेकवचन केले जाते. |
Note:- अनेकवचन करताना Apostrophe देऊ नये. |
काही एकवचनी नामांचे अनेकवचन करताना फक्त S प्रत्यय लागतो. Eg. boy - boys , desk - desks, book - books |
ज्या एकवचनी नामाच्या शेवटी s, sh, ch, x किंवा z पैकी अक्षरे असतील अशा नामाचे अनेकवचन करताना es प्रत्यय लागतो. Eg. Dish- dishes , box - boxes match - Matches |
ज्या नामाच्या शेवटी y आहे व y पूर्वी एखादा स्वर आहे, तर अशा नामाचे अनेकवचन करताना फक्त S प्रत्यय जोडला जातो. Eg.- boy - boys , essay - essays , valley -Valleys |
ज्या नामाच्या शेवटी y आहे परंतु y पूर्वी एखादे व्यंजन असेल तर अनेकवचन करताना y ऐवजी ies प्रत्यय जोडावा. Eg. story - stories , fly - flies |
ज्या एकवचनी नामाच्या शेवटी 'o' असेल; परंतु त्या पूर्वी एखादे व्यंजन असेल अशा नामाचे अनेकवचन करताना 'es' प्रत्यय जोडावा. Eg. - mango - mangoes , potato - potatoes |
अपवाद - वरील नियमाला अपवाद आहे. जी नामे इंग्रजीमध्ये परभाषेतून आली आहेत त्याचबरोबर संक्षिप्त रूप केलेल्या नामाच्या शेवटी 'o' असूनसुद्धा अनेकवचन करताना फक्त S प्रत्यय लागतो. Eg. photo - photos , piano- pianos, kilo - kilos |
ज्या नामाच्या शेवटी दोन 'स्वर' आहेत अशा नामांचे अनेकवचन करताना फक्त S प्रत्यय जोडावा. Eg. tree - trees , cuckoo - cuckoos , polio - polios |
जर नामाचा शेवट 'f' किंवा 'fe' ने होत असेल, तर ते काढून टाकून फक्त 'ves' प्रत्यय जोडावा. Eg.- leaves - life, wife - wives , wolf - wolves |
अपवाद - वरील नियमाला खालील नामे अपवाद आहेत. Eg.brief - briefs , roof - roofs , chief - chiefs , grief - griefs |
काही नामांच्या शेवटी अनेकवचन करताना 'en' किंवा 'ren' प्रत्यय लागतो. Eg. Ox - Oxen , child - children |
काही नामांतील स्वरात बदल करून अनेकवचन केले जाते. Eg. tooth - teeth , foot - feet , man - men |
काही नामांच्या शेवटी असणाऱ्या 'man' चे 'men' करून अनेकवचन केले जाते. Eg. work man - work men , gentle man - gentle men |
दोन नामांपासून तयार झालेल्या संयुक्त नामातील शेवटच्या नामाला 's' प्रत्यय जोडून अनेकवचन केले जाते. कारण यातील पहिला शब्द विशेषणाचे कार्य करतो व विशेषण एकवचनी असते. story - book story - books , play-room - play-rooms |
संयुक्त नाम जर in/of ने जोडल्यास पहिल्या मुख्य शब्दाचे अनेकवचन करावे. son-in-law - sons-in-law man-of-War - Men of War count-of-mail - counts-of-mail |
13) अक्षरे, संख्या व चिन्हांचे अनेकवचन करताना (s) वापरतात. Eg. T - Ts ,10 -10s |
आद्याक्षरांचे अनेकवचन 's' प्रत्यय जोडून करतात. Eg. MP - MPs VIP - VIPs , UFO - UFOs |
खालील संख्यादर्शक नामे; संख्यावाचक शब्दानंतर वापरल्यास अनेकवचनातसुद्धा त्यांचे रूप बदलत नाही; परंतु of पूर्वी वापरल्यास त्यांचे अनेकवचनात रूप बदलते. Eg. Thousand, hundred, score, gross, dozen etc. I bought five dozen mangoes. She spends thousands of rupees. |
खालील नामांचे एकवचन व अनेकवचनात रुप बदलत नाही. Eg. sheep, fish, deer, cannon, offspring, brace, cream, fruit, alphabet, moose, craft, swine, carp, grouse, trout, salmon etc. Eg.I saw a sheep. अपवाद - वरील नामांच्या संदर्भातील वेगवेगळ्या जातींचा उल्लेख केल्यास मात्र वरील नामे अनेकवचनी रूपात वापरली जातात. - Eg. Apple, orange, sweet lemon are fruits. |
इंग्रजी भाषेत परभाषेतून आलेल्या खालील शब्दांचे अनेकवचन अगदी वेगळ्याप्रकारे होते. crisis - crises ovum - ova genius - genii Axis - axes index - indices larva - larvad phenomenon - phenomena bacillus - bacilli nucleus - nuclei hypothesis - hypothonen |
दोन भागापासून बनलेल्या वस्तूचे भाग नेहमी अनेकवचनी रूपातच असते. अशा वस्तूंचा उल्लेख एकवचनी किंवा विषम संख्येत करू नये, तो नेहमी जोपयोगी किंवा अनेकवचनीच करावा. Eg. Pants, Pyjamas, Trousers, binoculars, spectacles |
खालील रोगांच्या नावाच्या शेवटी ' s' असले तरी क्रियापद मात्र एकवचनीच वापरातात. Measles, mumps, rickets, shingles. Eg 1) Measles has broken out in the city. |
खालील विषयांची नागे शास्त्र या अर्थाने वापरल्यास ती एकवचनी असतात; परंतु याव्यतिरिक्त अर्थाने वापरल्यास ती अनेकवचनी अर्थान वापरली जातात. Mathematics, Physics, Politics, Athletics, Ethics, Genetics, Economics, Linguistics, Mechanics, etc |
News, Innings, Algiers, Athens, Brussels, Maples, Wales, The United Nations, The United States या नामांचे रूप अनेकवचनी असले तरी क्रियापद एकवचनी वापरले जाते. Eg. 1) This news is not true. 2) India won by an innings and three runs. |
Means अर्थ साधन असा घेतल्यास एकवचनी व अनेकवचनी अशा दोन्ही अर्थांनी उपयोग केला जातो; परंतु Means चा अर्थ संपत्ती असा घेतल्यास तो नेहमीच अनेकवचनी असतो. i) Unfair mcans are not allowed here. ii) Acroplanc is the fastest means of communication, iii) Trucks and buses are means of travelling. |
भाववाचक नामाचे अनेकवचन केले जात नाही . Eg. 1) Honesty is the best policy. |
सामान्य परिस्थितीत पदार्थवाचक नामाचे व विशेषनामाचे अनेकवचन केले जात नाही व क्रियापद एकवचनी असते. Eg. Water, oil, tin, wood, Mohan, Mumbai. |
काही समूहवाचक नामे सामान्यपणे अनेकवचनी अर्थानेच वापरली जातात. त्यामुळे त्यांचे पुन्हा अनेकवचन करू नये; तसेच क्रियापद अनेकवचनी वापरावे तर काही समूहवाचक नामे एकवचनी अर्थाने वापरतात म्हणून क्रियापद एकवचनी वापरावे. Eg. 1) Cattle are grazing. |
Droughts , Billiards ,Gymnastics , Darts , Bowls, Dominoes वरील Games name एकवचनी अभिन वापरली जातात म्हणून क्रियापदही एकवचनीच असते. Eg. 1) Billiards in a popular game. |
Furniture , Machinery , Equipment , Drapery , Imagery , poetry , scenery , stationery , traffic , luggage , crockery , electricity , work , Dust , Rubbish , wood , Iron , print या शब्दांचे अनेकवचन करू नये तसेच क्रियापद एकवचनी वापरावे. Eg. I)This luggage is very heavy. 2) Shakespeare's poetry is very popular in the world |
शब्दयोगी अव्ययाच्या मागेपुढे तोच शब्द अल्यास त्याचे अनेकवचन करू नये, Eg. Day by day, woman after woman, row upon row |
Man, Lord हे शब्द संयुक्त नामाच्या सुरूवातीला असतील तर दोन्ही शब्दांचे अनेकवचन करावे. Eg. Man-servant - Men-servants , Lord-justice - Lords-justices |
30) Mens, Childrens था अनेकवचनांना Double Plurals असे म्हणतात |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा