epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

मी पाहिलेले स्वप्न

      मी पाहिलेले स्वप्न 

     (A Dream I Had) 

        एकदा मला एक सुंदर स्वप्न पडले मी एकदा अमेरिकेच्या नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरण्याच्या संबंधित अंतराळ मोहिमेबद्दल पुस्तक वाचले होते. मी अंतराळवीर असल्याचे स्वप्न पाहिले. मला अंतराळ वीराचे प्रशिक्षण घेताना मी पाहिले. अंतराळात वास्तव्य करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या खडतर प्रशिक्षणाविषयी मी वाचले होते. मी स्वतःला प्रत्यक्ष त्या खडतर प्रशिक्षणातून जात असल्याचे पाहिले. मी माझ्यासोबत माझे दोन सहकारीसुद्धा माझ्या अभियानात सामिल असल्याचे पाहिले. मी तो उत्साह समजू शकतो जेव्हा मी आम्हाला अंतराळयानाकडे जाताना पाहिले. आम्ही उड्डाणाकरता संपूर्ण सज्ज झालो होतो. आम्ही अंतराळयानात प्रवेश केला आणि यानाने उड्डाण केले. मी दुसऱ्या ग्रहाच्या जमिनीवर पाय ठेवणार होतो तो थरार अनुभवला.

आम्ही चंद्रावर उतरलो आणि मला पिसासारखे हलके वाटले. मी स्वप्नात पाहिले की, मी आणि माझे सहकारी चंद्रावरच्या माती आणि खडकाचे काही नमूने घेत होतो. त्यानंतर आम्ही पुन्हा पृथ्वीकडे उड्डाण केले. आम्ही सतत पृथ्वीवरच्या अंतराळ स्थानकाशी संपर्कात होतो. मी असे पाहिले की आम्ही पृथ्वीवर उतरण्याच्या बेतात असताना समुद्रात कोसळलो. मी भीतीने जोरात ओरडलो. माझे आईबाबा धावत माझ्या खोलीत आले आणि त्यांनी मला जागे केले. मला जाणीव झाली की मी बिछान्यातून खाली पडलो आहे आणि घामाने डबडबलो आहे. माझा तो थरारक अनुभव म्हणजे फक्त एक स्वप्नच होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा