epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

रेल्वेस्थानकावर एक तास

         रेल्वेस्थानकावर एक तास 

(An Hour at the Railway Station)       

       माझ्या आजारी काकूला भेटण्यासाठी मी डेहराडूनला गेलो होतो. घरी परतताना मी डेहराडून ते मुंबई असा रेल्वेने आलो. रेल्वे निघण्याच्या सुमारे तासभर ते आधीच मी रेल्वेस्थानकावर आलो. माझे तिकीट अगोदरच आरक्षित झाले होते म्हणून मी रेल्वे फलाटावर रेल्वेची वाट पाहत होतो.

         रेल्वेस्थानकावर खूपच गर्दी होती. तिकीट मिळविण्याच्या खिडकीवर बरीच मोठी रांग होती. हमाल सामान वाहून नेत होते आणि काही कुटुंबीय आपल्या आप्तस्वकीयांना भेटण्यासाठी वाट बघत होते. तर काही कुटुंबीय आप्तांना निरोप देत होते. रेल्वेस्थानकावर सर्व प्रकारची मंडळी होती. तेथे हिमालयात गिर्यारोहणाला जाणारी शालेय मुले, माणसे, महाविद्यालयीन विद्यार्थी, कुटुंबीय आणि कडेवर मूल घेतलेल्या महिला होत्या, तसेच भिकारी आणि रेल्वेचे अधिकारीसुद्धा होते.

नीट निरीक्षण केले असता रेल्वेस्थानकावर वेगवेगळ्या भावनांचा संगम पाहायला मिळतो. काही माणसे त्यांच्या मित्रांशी प्रसन्नपणे गप्पा मारत होती, तर काही कुटुंबे, त्यांचे जाप्त दीर्घ काळानंतर परतणार असल्याने उत्साहात होती. काही जण निरोप देत असल्याने दुःखी होते शालेय मुलाचा गट हिमालयाच्या हिमाच्छादित पर्वतांवर गिर्यारोहणासाठी जाण्यासाठी उत्साहित होता. काही माणसांची रेल्वे उशिरा असल्याने त्यांची चुळबूळ सुरू होती. 

        रेल्वेस्थानकावरचे वातावरण विविध प्रकारच्या आवाजांनी तसेच घुराने भरलेले होते. काही रेल्वे आल्या आणि प्रवाशांचे स्मितहास्य, मिठ्या आणि हास्याच्या फवाऱ्यांनी स्वागत झाले. काही जणांनी निरोपाच्या मिठ्या मारल्या आणि त्यांच्या डोळ्यात विरहाचे अश्रू तरळले. रेल्वेस्थानकावर वर्तमानपत्रे, मासिके आणि कादंबचा विकणारी दोन पुस्तकाची दुकाने होती. मी रेल्वेत वाचण्यासाठी वर्तमानपत्र आणि कादंबरी विकत घेतली आणि एका छोट्या उपाहारगृहात चहादेखील घेतला. 

        माझी रेल्वे सुमारे तासाभराने आली. ती वेळेवर होती. मी रेल्वेत चढून माझी बोगी शोधली रेल्वेस्थानकावर तासभर व्यतीत करणे हा एक वेगळाच अनुभव होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा