epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

सार्वजनिक रुग्णालयात एक तास

          सार्वजनिक रुग्णालयात एक तास 

(An Hour at a General Hospital)        

          मागच्या महिन्यात मी एका सार्वजनिक रुग्णालयाला भेट दिली. माझ्या एका मित्राला भेटण्यासाठी म्हणून मी तेथे गेलो होतो. तो पडल्याने त्याच्या पायाचे हाड मोडले होते. दवाखान्यात पाऊल टाकताच त्याच्या भव्यतिची मला कल्पना आली. जंतुनाशकांचा उग्र दर्प तेथे सर्वत्र जाणवत होता. तो दवाखाना खूप स्वच्छ होता आणि तेथे अनेक विभाग तसेच स्वतंत्र कक्ष होते.

        मला पाहून माझ्या मित्राला आनंद झाला. त्याच्या शेजारील खूर्चीवर बसून, मी त्याच्या तब्येतीची चौकशी केली. मी त्याच्यासाठी फळे व वाचावयास काही पुस्तके आणली होती त्याचा पाय प्लॅस्टरमध्ये बांधलेला होता, तेथे खूप रुग्ण होते काहीना बँडेज बांधलेले होते तर काही झोपलेले होते.

       मी इतर विभागाचीही पाहणी करून आलो तेथे सर्व प्रकारची माणसे होती, काही वयोवृद्ध तर काही तरुण एका लहान मुलाने आपला हात गमावला होता व त्यामुळे तो हातच छेदून काढावा लागला होता. हातात कुबड्या घेऊन तो आजूबाजूला चालत होता तेथे प्रौढ रुग्णदेखील होते. त्यातील काही असहय वेदनांमुळे कण्हत होते.

          शल्यचिकित्सा आणि शस्त्रक्रिया विभाग हे दवाखान्याच्या दुसऱ्या बाजूला होते. डॉक्टर्स आणि परिचारीका शांतपण बाबरत होते. आणि कुशलतेने आपले कार्य पार पाडत होते परिचारीकांनी शुभ वस्त्रे आणि डॉक्टरांनी श्वेत लांब उगले परिधान केलेले होते त्यांच्या गळ्याभोवती श्रवणनलिका लटकत होती. 

      दवाखान्यातील वेदना पाहून जरासा खिन्न मनानेच मी घरी परतलो तरीसुद्धा अगदी निःस्वार्थ बुद्धीने काम करणाऱ्या आणि रुग्णांची पीडा कमी करण्यासाठी त्यांची काळजी घेणाऱ्या परिचारीका आणि डॉक्टर्स पाहून, मी त्याचबरोबर आनंदीही झालो होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा