epranali

This is educational blog.

Res

Breaking news

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

मदर तेरेसा

         मदर तेरेसा 



      (Mother Teresa

          मदर तेरेसा म्हणजेच अग्नेस गोंकशे बोजशियूचा जन्म २६ ऑगस्ट, १९१० रोजी युगोस्लाव्हियात झाला. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांनी अगदी कोवळ्या वयात म्हणजेच वयाच्या बाराव्या वर्षी ठरवले की, आपले जीवन गरिबांसाठी जगावे. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्या भारतात आल्या आणि कोलकात्यातील कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जिथे लॉरेटो सिस्टर्स शिक्षिका होत्या तिथे येऊन दाखल झाल्या. त्यांनी वयाच्या २८ व्या वर्षी साध्वी म्हणून शपथ घेतली. त्यांच्या सभोवती गरिबी आणि आजाराचे प्रमाण प्रचंड होते. आता त्यांचे साध्वीचे जीवन पूर्णतः बदलले. त्यांनी गरीब, आजारी आणि अनाथांची सेवा करण्याचा खरा विचार केला. उदाहरण सांगायचं तर, पुढे पुष्कळजण आलेआणि त्यांना येऊन मिळाले. मदर तेरेसांनी १९५० मध्ये प्रसिद्ध 'मिशनरीज ऑफ चॅरिटी'ची स्थापना केली. अल्पावधितच त्यांनी अनाथांसाठी घरे, शाळा आणि इस्पितळे उघडली आणि त्यांचा भारतभर विस्तार केला. आज घडीला या मिशनरीज चॅरिटीचे फक्त भारतात १५० पेक्षा अधिक केंद्रे आहेत आणि एवढेच नव्हे तर जगातील अनेक देशांत याची केंद्रे आहेत. मदर तेरेसाला त्यांचे निःस्वार्थ कार्य आणि सामाजिक सेवेबद्दल भारतात अनेक पारितोषिकं बहाल करण्यात आली. अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला शांततेचा नोबेल पुरस्कार त्यांना १९७९ देण्यात आला. त्याच वर्षी त्यांना भारतरत्न देण्यात आला. त्यांचा संपूर्ण दिवस अथक परिश्रमात जात असे. ५ सप्टेंबर, १९९७ रोजी कोलकाता येथे त्यांचे निधन झाले. मदर तेरेसा या खऱ्या संत होत्या. त्या भारतातच आदरणीय नव्हता, तर जगभर आदरणीय होत्या. त्यांचा मृत्यू म्हणजे जगातून कृतज्ञता आणि शांतीची देवताच लोप पावली, असा आहे. मदर तेरेसाच्या कार्यासाठी वाहून घेतलेल्या जगातील सर्वांना मात्र त्यांच्या प्रेमाची उणीव भासेल हे नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा