epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

ईद

                  ईद

                (Eid) 

            ईद हा मुस्लिमांचा सर्वात महत्त्वाचा सण आहे. मुस्लिम लोक वर्षभरात तीन वेळा ईद साजरी करतात. रमजान हा उपवासाचा महिना आहे. हे उपवास अतिशय कडक असतात आणि मुस्लिम लोक दिवसभरता एकही थेंब पाणी पित नाहीत. सूर्यास्तानंतर उपवास सोडला जातो. सुमारे महिन्याभराच्या उपवासानंतर चंद्र दिसण्याच्या दुसऱ्या दिवशी रमजान ईद साजरी करण्यात येते. या सणाला ईद-ऊल-फित्रा, असे संबोधतात. हजरत इस्माईल यांच्या त्यागाच्या स्मृतीप्रत्यर्थ बकरी ईद साजरी केली जाते. हा सण ईद-ऊल-फित्राच्या साधारण दोन महिने नऊ दिवसांनी येतो. या सणासाठी ज्या मुस्लिमांना शक्य असते ते लोक मक्केला यात्रेला जातात. याला हजची यात्रा म्हटले जाते. या सणाला ईद-ऊल- झुहा असे म्हणतात. तिसरी ईद ही अतिशय उत्साहात साजरी केली जाते तिला ईद-ए-मिलाद असे म्हटले जाते आणि ती प्रेषित मोहम्मद यांच्या जन्मदिवसाबद्दल साजरी केली जाते. प्रत्येक ईदचा दिवस हा सकाळी  मशिदीतल्या नमाजाने सुरू होतो.  मुस्लिम लोक नवीन कपडे घालतात आणि एकमेकांना प्रेमाने शुभेच्छा देतात. ईद म्हणजे जूने सर्व भेदभाव विसरून नव्याने एकत्र येऊन नवीन सुरूवात करण्याचा सण आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा