epranali

This is educational blog.

Res

Breaking news

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

भारतीय शेतकरी

        भारतीय शेतकरी



      (An Indian Farmer) 

           भारत हा खेड्यांचा देश आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती कसणे आणि कृषी काम करणे आहे. शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तो आपल्यासाठी धान्योत्पादन करतो. तो आघाडीवर असला तरी खडतर आणि साधे जीवन जगतो. शेतकऱ्याचा दिवस सूर्योदयापूर्वी सुरू होतो. तो आपल्या बैलाला घेऊन शेतात औत हाकतो वा नांगर चालवतो. शेत नांगरतो, बी पेरतो आणि त्याला पाणी घालतो. नंतर पिकाची कापणी करून घरी आणतो. शेतकरी वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी कामे करतो.

तो भटकणारे गुरेढोरे आणि चोरांपासून पिकांचे रक्षण करतो. भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनात बैलाला अतिमौल्यवान स्थान आहे. कधी-कधी त्याची पत्नी आणि मुले त्याला शेतीकामात मदत करतात. शेतकरी हा गरीब आहे. कधी-कधी त्याला दिवसाचे दोन वेळचे जेवण मिळत नाही. तो आपल्या मुलांना •व्यवस्थित शिक्षण देऊ शकत नाही. त्याची पत्नी त्याला शेतीकामात मदत करते. शेतकरी गवतापासून बनविलेल्या झोपडीत राहतो. भारतीय शेतकऱ्यांची सण साजरी करण्याची अत्यंत साधी पद्धत आहे. तो दिवाळी, पोळा, होळी आणि त्याच्या मुलाचा जन्म आणि लग्ने साजरे करतो. अलीकडे आधुनिक मशिनरी आणि तंत्राने शेतकऱ्याने शेतीत अनेक पिके घेऊन विस्तार केला आहे. तो आता प्रतिष्ठा मिळवून आपले जीवन सुकर बनवत आहे. आता तो कमी कालावधीत विविध पिके घेऊन अधिक धान्य उत्पादन करीत आहे. त्याच्यासाठी सरकार विविध योजना, सुविधा आणत आहे. म्हणून शेतकऱ्यांची स्थिती गरीब असली तरी त्याच्यात हळूहळू सुधारणा होत आहे.

1 टिप्पणी: