epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

सबसे प्यारी जान

                ‘सबसे प्यारी जान



          नेहमीप्रमाणे गप्पा मारता मारता बादशहाने बिरबलाला विचारले, 'बिरबल, या जगात प्रत्येकाला सर्वात प्रिय अर्थाने काय असते?' क्षणाचाही विलंब न लावता बिरबल म्हणाला, 'सबसे प्यारी जान !' 'छे:! बिरबल, असं कसं असेल? कुणाला दौलत प्यारी असते, कुणाला एखादी वस्तू प्यारी असते, कुणाला एखादा माणूस प्यारा असतो, कुणाला आपलं मुल प्यारं असतं !' बादशहा म्हणाला, 'तरीसुद्धा या सगळ्यात प्रत्येकाला आपला प्राण प्यारा असतो. तुम्हाला येत्या दोन-तीन दिवसांत दाखवून देईल मी. बिरबलाने निश्चयपूर्वक सांगितले. बरोबर तिसऱ्या दिवशी बिरबल एका माकडिणीला तिच्या पिलासह घेऊन आला. एक हौद त्याने नोकरांकडून रिकामा करून घेतला. त्या हौदाच्या मधोमध एक खांब पुरून ठेवला. माकडिणीला तिच्या पिलासह त्याने आत सोडले आणि नोकरांना हौदात हळूहळू पाणी सोडायला सांगितले. बिरबलाने बादशहाला माकडिणीचे निरीक्षण करायला सांगितले. हौदात पाणी येताच माकडीण आपल्या पिलासह खांबावर चढली. हळूहळू पाणी खांबाच्या देखील वर जाऊ लागले. आता माकडीण पिलाला डोक्यावर घेऊन दोन पायांवर उभी राहिली, आणि हळूहळू पाणी तिच्या गळ्यापर्यंत आले. अगदी नाकापर्यंत पोहोचले. आता आपण मरणार, असं वाटून तिनं डोक्यावरचं पिलू चटकन पायाखाली घेतलं आणि ती त्यावर उभी राहिली. बिरबलाने, बादशहाने ते पाहिले. बादशहाकडे बिरबलाला थोपटले. तो पुटपुटला, 'सच्ची बात है, सबसे प्यारी जान !"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा