epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

आई ती आई

                 'आई ती आई' 

          मुल होत नसलेल्या एका बाईने दुसऱ्या एका बाईचे दोन तीन महिन्यांचे मूल पळविले. खऱ्या आईला चोरट्या बाईचा पत्ता लागताच, ती तिच्याकडे गेली व आपले मुल मागू लागली, पण ती चोरटी बाई ते मूल आपलेच असल्याचा कांगावा करू लागली. अखेर ते प्रकरण न्यायालयात  गेले. न्यायमूर्ती अत्यंत चतुर होते. त्यांनी दोघींनाही अनेक प्रश्न विचारले, परंतु दोघीनीही अशी चपलख इत्तरे दिली, की न्यायमूर्तीनाही या दोघीतली खरी आई कोण? हा प्रश्न पडला. अखेर न्यायमूर्ती या दोन बायांना खंर वाटेल अशा तऱ्हेने मुद्दाम म्हणाले, ' तुम्ही दोघीही हे मूल आपलेच असल्याचा दावा करता व हे मूल नक्की कुणाचे आहे हे कळणे कठीण आहे. त्या अर्थी मी या मुलाला कापून त्याचा अर्धा भाग तुम्हा दोघींपैकी प्रत्येकीला देण्याचा सेवकाला हुकूम सोडतो. न्यायमूर्तीचा हा कठोर निर्णय ऐकूण चोरटी बाई गप्प बसली, पण त्या बालकाची खरी | आई कळवळून व हात जोडून न्यायमूर्तीना म्हणाली, 'महाराज, असे कठोर होऊन माझ्या बाळाचा जीव घेऊ नका, वाटल्यास माझ बाळं या बाईला द्या, पण असं काही करू नका. कुणीकडे का असेना, माझं लेकरू सुखरूप असलं की झालं महाराज! घालाल ना एवढी भिक्षा मला? त्या बाईच्या अंतरीच ते अपत्यप्रेम पाहून न्यायमूर्ती त्या लुच्च्या बाईला म्हणाले, हे बालक या बाईचंच आहे. त्याला कापण्यात यावं.' 'असं मी मुद्दामच खोटं बोलले. पण त्यामुळे तुझा खोटेपणा उघड झाला.' तू जर खरोखरच या बालकाची आई असतीस मी असा कठोर निर्णय दिल्यानंतर, अशी निर्विकारपणे बघत राहिली नसतीस. दे ते बाळ त्या बाईला परत. अशारीतीनं त्या चोरट्या बाईच्या ताब्यात असलेल मूल त्याच्या खऱ्या आईला देण्यात येऊन, न्यायमूर्तीनी त्या चोरट्या बाईला पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा