epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

श्वांगचे चातुर्य

                  श्वांगचे चातुर्य 



                  : ही गोष्ट आहे चीन देशातील एका मुलाची. त्या मुलाचे नाव होते श्वांग चू. एक दिवस श्वांग चू आपल्या धाकट्या बहिणीला शाळेत पोचवावयास निघाला होता. रस्त्याने जात असताना त्याला कुणाचा तरी मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आला, " मुला, पळ, तळ लवकर ! पिसाळलेला कुत्रा येत आहे. पळ लवकर, नाही तर कुत्रा चावेल!' श्वांगने इकडे तिकडे पाहिले. एक भला मोठा काळा कुत्रा त्याच्याकडे धावत येत होता. श्वांगला संकटाची कल्पना आली. आता काय करावे? त्याला समजेना. बहिणीला घेऊन पळणे अवघड होते. आपण  एकटेच पळालो तर कुत्र्याच्या तावडीत बहीण सापडेल. येथेच थांबलो तर कुत्रा आपल्या दोघांनाही चावेल. आता काय करावे ? याच क्षणी श्वांगला व युक्ती सुचली, त्याने झटकन आपला कोट काढला व तो आपल्या उजव्या हाताला गुंडाळला. त्याने आपल्या बहिणीला आपल्या पाठीमागे घेतले व डाव्या हाताने तिला घट्ट पकडून ठेवले. इतक्यात तो पिसाळलेला भयंकर कुत्रा श्वांगवर चाल करून आला. त्याने आपले पुढचे दोन पाय श्वांगच्या छातीवर ठेवले व त्याला चावण्याचा तो प्रयत्न करू लागला परंतु श्वांगने कोट गुंडाळलेला हात पुढे करून त्या कुत्र्याला जोरात प्रतिकार केला. कुत्रा भयंकर क्रूर पाला होता. श्वांगच्या पाठीमागे असलेली त्याची बहीण अगदी भेदरली होती. श्वांग आणि कुत्रा यांची झटापट चालू होती. इतक्यात काही लोक धावत आले. त्यांनी त्या पिसाळलेल्या कुत्र्याला लाठ्या काठ्यांनी बदडून काढले व त्याला ठार मारले. श्वांगची व त्याच्या बहिणीची मोठ्याच संकटातून सुटका झाली. तिथे जमलेले लोक श्वांगला म्हणाले, "अरे, हा पिसाळलेला कुत्रा धावत येत होता हे तुला दिसत होते. मग तू पळाला का नाहीस? एखाद्याच्या घरात तरी शिरायचं " श्वांग म्हणाला, "मी कसा पळणार? एकटा असतो तर पळालो असतो. पण माझ्याबरोबर असलेली माझी ही धाकटी बहीण पळू शकली नसती. मी वाचलो असतो पण माझी बहीण कुत्र्याच्या तावडीत सापडली असती. कुत्रा तिला चावला असता म्हणून मी तिला माझ्या पाठीमागे धरून ठेवलं व उजव्या हातावर कोट गुंडाळून कुत्र्याला प्रतिकार केला." श्वांगाने आपल्या हातावर कोट गुंडाळला होता. त्यामुळे त्या कुत्र्याचा एकही  दात त्याला लागला नव्हता. श्वागांने मोठ्या चातुर्याने, धाडसाने आपले व आपल्या बहीणीचे रक्षण केले. लोकांनी त्याचे खूप खूप कौतुक केले. कोणतेही सटअ असता गोंधळून न जाता संकटाला धैर्याला तोंड दिले पाहिजे. श्वांगने प्रसंगावधान दाखविले नसते तर त्याचे आणि त्याच्या बहिणीचे प्राण वाचले नसते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा