epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

खरा मित्र

                  खरा मित्र

           राघू ससा नुकताच आधीच्या पिंजऱ्यात असलेल्या तीन सशांसोबत राहायला आला होता. नवीन असल्यामुळे राघूला पिंजऱ्यातले जीवन कठीण वाटत होते, त्याला नेहमी जंगलातील मोकळेपणाची आठवण येत असे. त्यामुळे त्याचे डोक्यात येथून सुटका कशी करून घ्यावी याचे विचार सतत सुरु असायचे. लवकरच त्याला सुटकेचा मार्ग दिसला. त्याने त्या मार्गाचा फायदा घेऊन जंगलात पळ काढला. जंगलात जुना मित्र मुन्नू राघूची भेट झाली. दोघांना खूप आनंद झाला. गळ्यात गळा घालून दोघेही चांगले हुंदडले मुन्नूने बुला विचारले, इतके दिवस तू कोठे होतास? काय केले ? राघूला तर आधीच आनंद झाला होता. त्या आनंदाच्या भरात त्याने आपल्यावर आलेल्या संकटाची इत्थभूत हकीकत कथन केली. तेथून कसा सुटून आलो याची सुध्दा माहिती सांगितली. त्यानंतर दोघेही एका गाजराच्या शेतात गेले. पोटभर गाजरे खाल्ली. नंतर ते आपल्या घरी परत आले. आता आनंदाचा भर ओसरला होता. राधूला आता पिंजऱ्यातील मित्रांची आठवण झाली. मुन्नूला म्हणाला, 'मला आता घरी यायचे नाही' आधी | पिंजऱ्यातील तीन मित्रांची सुटका केल्याशिवाय मला काहीच सुचत नाही. मुत्रूने विचारले. तुझ्या मित्रांची सुटका करण्याची काही योजना आखली आहेस काय? तेव्हा राघू डोक्याला हात लावून विचार करू लागला. एकाएकी त्याचे डोक्यात एक विचार आला. तो म्हणाला, 'आपला मित्र कुटकुट इंदीर आहे. त्याला भेटून आपण इपाय शोधून काढू. त्याचे दात तीक्ष्ण आहेत. त्याला पिंजऱ्याची जाळी कतरायला सांगू, माझ्या मित्रांना बाहेर आल्यावर आपल्या सोबत घेऊन येऊ.' मुन्नूला राघूचा विचार आवडला. ते कुटकुट उंदीराला भेटायला आले. कुटकुट उंदराने योजनेप्रमाणे मदत करण्याचे कबूल केले. तिघांनी आपला बेत रात्रीच्या अंधारात तडीस नेण्याचे ठरविले. रात्री अचानक खूप पाऊस आला. तरीही भीती न बाळगता तिघेही निघाले. रस्ता दाखवण्याचे काम राघूने केले. तिघेही अखेरीस पिंजरा ठेवलेल्या खोलीजवळ पोहोचले. लगेच कुटकुट उदराने पिंजऱ्याची जाळी कतरण्याचे काम सुरु केले. पिंजऱ्यातील राघूच्या तिन्ही मित्रांना खूप आनंद झाला. बऱ्याच खटपटीनंतर कुटकुट इंदिराने आपले काम पूर्ण केले. | पिंजऱ्याचा दरवाजा इघडला गेला. आतील तिन्ही ससे बाहेर आले. त्यांनी राघू, मुन्नू आणि कुटकुट इंदराला आनंदाने कडकडून मिठी मारली. तिघानींही म्हटले की, एवढा पाऊस सुरु असतानाही तुम्ही आमच्यासाठी किती कष्ट घेतले! तुम्ही तुमच्या जीवाची देखील पर्वा केली नाही. तुमच्या या कष्टामुळेच आमची सुटका झाली. 'राघू तू आमचा खरा मित्र आहेस.' असे तिघानींही कळवळून म्हटले. 'खरा मित्रच मित्राला दुःखामध्ये मदत करीत असतो.' आम्हा सर्वांना राघू प्रमाणेच धैर्यवान व परोपकारी बनले पाहिजे. कुटकुट उंदीर म्हणाला, 'पारतंत्र्यात पोटभर खायला मिळत असले तरी खरे सुख स्वातंत्र्यात असते. जंगलात आम्ही उपाशी राहिलो तरी स्वातंत्र्याचा आनंद काही वेगळाच असतो.'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा