epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

संत शिरोमणी गुरु रविदास

       संत शिरोमणी गुरु रविदास


          सिद्धार्थ गौतम बुद्धांचे विचाराचे गुरु रविदासांचा जन्म या भारत देशात अशा वेळेस झाला, की ज्या वेळेस  अन्याय, अत्याचार होत होते. हिंदुसमाजव्यवस्थेत जातिवाद, वर्णवाद, रूढ़िवाद, पुरोहितवाद, अस्पृश्यता वाढत होती. अशा कठीण परिस्थितीमध्ये रविदासांचा जन्म मानवतेच्या रक्षणासाठी १५ फेब्रुवारी १३९८ मध्ये चंबर वंशात, रविवार माघ पौर्णिमेला, काशीजवळ गोवर्धनपूर (मांडुरगडी) येथे झाला. गुरु रविदासांच्या वडिलांचे नाव रघुनंदन आणि आईचे नाव करमादेवी होते. रविदासाना लोनाबाई नावाची पत्नी होती. त्यांच्या आजोबांचे नाव हरिनंदन, तर आजीचे नाव चत्राकोर असे होते गुरु रविदासांनी संपूर्ण देशात भ्रमण केले. पंजाबी भाषेत रैदास किंवा रेयौदास, हिंदीमध्ये रैदास व रविदास, राजस्थानीमध्ये रोहिदास, बंगालीमध्ये रुईदास किया स्यदास, मराठीमध्ये रोहिदास किंवा रोहिदास गुरु रविदासाना अशा विविध नावांनी ओळखले जाते. गुरु रविदास १२ वर्षांचे असतांनाच आध्यात्मिक साधुसंतांचा आदर करायचे. पुढे वर्षानुवर्षे चालत आलेल्या अन्याय-अत्याचार आणि शोषणाच्या विरुद्ध ते स्वतः उभे राहिले. गुरू रविदासांनी आपल्या अमृत वाणीने संपूर्ण भारत जागृत केला जातीजातीत विभागलेल्या समाजाला एकतेच सूरात बांधून, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. गुरु रविदासांची प्रतिभा ज्ञान आणि कार्य यांची स्तुती अनेक संतानी केलेली आहे. ज्यात संत ज्यात संत तुकाराम, गुरू नानक, गुरू क कवीर, संत सेना, संत मीराबाई, संत एकनाथ, संत धन्ना, संत हरिदास, संत चरणदास, संत दादू, संत नाभादास इ. गुरू रविदास क्रांतिकारक होते. गुरु रविदासांनी चमत्कार, अप: विश्वास आणि ढोंगी प्रवृत्तीवर उपडपणे प्रहार केलेत: गुरु रविदासांची ओळख, त्यांची साधुता, सत्यनिष्ठा, पवित्रता, सदाचरण, सद्ज्ञान आणि करुणा इत्यादी सद्गुणांच्या कारणाने आहे. गुरू रविदासांनी सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करावा. धर्मपडितांनी ज्या वेदाना अपौरुषेय मानले, सर्व समस्यांवर उपाय मानले गेले; परंतु वेदांना ऐकण्याचा आणि वाचण्याचा बहुजन समाजाला अधिकार नव्हता अशा वेदांचे गुरु रविदासानी खंडण केले, त्यांना नाकार श्री दशरचपुत्र रामाला नाकारले आणि आत्मारामाच्या उपासनेचा सल्ला दिला. गुरू रविदासांनी मूर्तिपूजेचे खंडण, तसेच बाह्य अवडंबरावर पणाघाती तसेच गुरु रविदासांनी आपात केलेला आहे. ते निर्गुण, निराकार, निरंजनाचे भक्त होते पुनः ते म्हणतात, आई-वडील व गरीब, दुःखी लोकांची सेवा करा, त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करा तरच तुम्हाला शांती मिळेल. मानवाच्या कल्याणासाठी काही तत्वे सांगितली आहेत. ते म्हणतात आम्ही राग आणि द्वेषापासून दूर राहिले पाहिजे. तृष्णांचा त्याग केला पाहिजे आळस, हिंसा, काम, क्रोध आणि मोह यांचा त्याग केला पाहिजे. आम्ही सत्याचा आणि प्रामाणिकरणाचा मार्ग सोडू नये. मनामध्ये आम्ही समाधान ठेवायला शिकले पाहिजे. शील (सदाचार जीवनाचा आधार प्रयत्न केला त्याच प्रकारे हा देश कसा आहे, या गोष्टीचे जीवनात अनुसरण करायला पाहिजे. त्यांनी विषमतेच्या विरोधात जनमत तयार करायचा असावा याविषयी गुरु रविदास म्हणतात- बेगमपूर सहर को नाऊँ, दुख अंदोह नहीं तेहि ठाऊं। शहर हे शोकहीन व्हायला पाहिजे, तेथे कोणतेही दुःख असू नये, कशाचीही चिंता असू नये, सुखी समृद्ध असायला पाहिजे. कोणताही भेद असू नये. रविदासांनी मानवी हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांची प्रत्येक कृती स्वातंत्र्य, समता व बंधुता यांवर आधारित होती. हीच तत्त्वे भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आलेली आहेत. रविदासांचे विचार आणि भारतीय संविधानाची रूपरेखा यात समानता आहे. गुरु रविदास हे मानवतावाद, बुद्धिवाद, बंधुत्ववाद व न्यायप्रियता याचे प्रतीक आहेत. मूर्तिपूजा, कर्मकांड व चमत्कार यांस विरोध केला. जातीव्यवस्थेवर आधारलेल्या समाजव्यवस्थेस व ब्राह्मणी ग्रंथांच्या प्रामाण्यवादास नकार दिला. नीतिमत्तेवर आधारलेल्या सदाचाराचा पुरस्कार केला. याच तत्वांसाठी विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवनभर संघर्ष केला, गुरु रविदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात शतशः साम्य आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा