epranali

This is educational blog.

Res

Breaking news

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

साधूचा संन्यास

                'साधूचा संन्यास'



            : स्वामी रामतीर्थ एक दिवस गंगेच्या किनाऱ्याने फिरायला गेले होते. सहज फिरता फिरता त्याचे लक्ष एका साधूकडे गेला, तो नदीकाठच्या एका झाडाखाली झकास विश्रांती घेत पहुडला होता. स्वामीजी त्याच्याजवळ गेले. त्याला आदराने प्रणाम केल. त्याच्याजवळ, त्याच्या पायाशी जाऊन बसले. तो साधू मात्र तसाच ऐटीत लोळत पडला होता. स्वामींनी त्याला विचारले 'बाबा! संन्यास घेऊन किती दिवस झाले आपणांस?' 'दिवस ? अरे, दिवस काय विचारतोस, किती वर्षे झाली हे विचार,' तोऱ्यानेच तो साधू म्हणाला. 'बरं बरं! चुकलो महाराज किती वर्षे झाली असतील?' नम्रतेने स्वामीजींनी विचारले. 'तब्बल तीस वर्षे झाली बेटा! समजलास?" साधूने उत्तर दिले. 'अरे व्वा! मग या तीस वर्षात आपण खूपच साधना केली असेल. बरीच सिध्दी प्राप्त झाली असेल आपणास.' 'होय तर! उगाच नाही केले एवढे खडतर तप. एवढी उम्र तपश्चर्या!' अहंभावाने साधू म्हणाले. 'कोणकोणत्या सिध्दी प्राप्त झाल्या महाराज आपणाला?' स्वामीजींनी पुन्हा अत्यंत नम्रपणे प्रश्न केला. 'बेटा! समोर बघ काय दिसतेय तुला?" समोर गंगेचा विशाल खोल संथ प्रवाह वाहत होता. 'गंगामाई!' स्वामीजी उत्तरले. 'हां, तर ही गंगामय्या आहे ना, तिच्या या विशाल खोल जलप्रवाहावरून अगदी सहजपणे लीलया त्या किनाऱ्यापर्यंत चालत जाऊ शकतो,' गर्वाने तो साधू म्हणाला. 'आणखी महाराज' 'आणखी तसाच परत त्या पलीकडल्या किनाऱ्यावरून या किनाऱ्यापर्यंत चालत येऊ शकतो.' साधू अधिकच गवनि म्हणाला. 'व्वा! व्वा! याच्याशिवाय आणखी काही?' 'बेटा! याला तू सामान्य काम समजतोस? तब्बल तीस वर्षे त्यासाठी मी तपस्या केली, तेव्हा कुठे ते शक्य झालं मला समजलास?' जरा रागावूनच साधू महाराज बोलले. 'महाराज! माफ करा. पण या एवढ्याशा सोप्या कामासाठी तुम्ही तुमची साधनेची बहुमोल तीस वर्षे 'पाण्यात घालविली असेच मला वाटते. अहो, या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर जाण्यासाठी साधी नौका चालते. तीत बसून | केवळ दोन आणे नावाड्याला दिले तर आपण इकडूनतिकडे किंवा तिकडून इकडे सहज ही गंगामय्या पार करू शकतो. आपण या तीस वर्षांत काय मिळवलेंत? एक सामान्य माणूस चार-दोन आण्यात जे करू शकतो ते? आपण तपस्या जरूर केलीत ज्ञानाच्या समुद्रात बुडी मारून त्यातले मोती हस्तगत करायच्या ऐवजी केवळ एखादा मोठा दगड घेऊन आपण वर आलात, असे नाही वाटत आपल्याला? त्या दगडाचा सामान्य माणसांच्या उद्धारासाठी काय उपयोग? सामान्यांचे जीवन सुधारण्यासाठी आपली तपश्चर्या निरुपयोगीच ठरली नाही का?" तो साधू निरुत्तर झाला. त्याचा अहंभाव क्षणात माळवला. ताड्कन उठून स्वामीजींच्या समोर नतमस्तक होऊन त्याने त्यांच्या पायावर डोके ठेवले तो त्यांचा एकनिष्ठ सेवक बनला व सामान्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करणारे कार्य स्वामीजींच्या बरोबर करू लागला..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा