epranali

This is educational blog.

Res

Breaking news

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

प्रार्थनेची संकल्पना

            प्रार्थनेची संकल्पना 



            : शाळा किंवा इतर कोणताही कार्यक्रम असो, त्याची सुरुवात प्रार्थनेने होते. प्रार्थनेत काहीतरी उदात्त विचार किंवा भावना असते. धार्मिक किंवा राष्ट्रीय विचाराचा व भावनाचा मनावर संस्कार व्हावा, हा त्याचा हेतू असतो, परंतु आपण प्रार्थना करताना काय करतो? प्रार्थनेचा अभिनय करतो ठराविक पवित्रा, मुद्रा आणि ओठाची हालचाल यापलीकडे प्रार्थनेला अर्थ उरत नाही म्हणनूच त्याचे फळही मिळत नाही. 'गीतेमध्ये 'मनाला' सहावे इंद्रिय म्हटले आहे. जे सर्वांत जास्त शक्तिमान आहे; परंतु इतर इंद्रियाप्रमाणेच ते सुदृढ आणि सुंदर घडणीचे व्हायला प्रार्थना हे एक आदर्श व्यायामस्वरूप आहे. प्रार्थनेत अनेक सोज्वळ वास्तववादी विचार असतात, प्रार्थना म्हणत असताना त्यातील एखाद्या विचारावर केल्यास हळूहळू या प्रार्थनेतील अर्थ मनापुढे साकार होऊ लागतो व त्याचा मनावर परिणाम होतो. पुढे याचाच परिणाम आपल्या आवरणावर मन केंद्रित धातूच्या पत्र्याला ठोकून ठोकून सुंदर आकार देता येतो, तशी प्रार्थनाही माणसाच्या मनाला विचारांचा आणि भावनांचा सूक्ष्म धक्का देणारी शक्ती आहे. या शक्तीचा आपण बुद्धिपुरस्सर उपयोग करून घेतला तर निर्भर, निर्वैर आणि निकोप संस्कार मनावर होतील. आपल्या मनाची सुदृढता वाढेल. तो संस्कार आपले आचरणही उजळून टाकेल. श्रीरामकृष्ण परमहस म्हणतात की, मातीतून माणस निर्माण करणे आणि पुढे त्या माणसातून भरातून नारायण निर्माण होण्याची शक्यता प्रार्थनेत असते. आपली कर्मगती, सत्सगती आणि गुरुकृपा यांना सतत अनुकूल ठेवून, आपले आत्यंतिक कल्याण आणि सर्वांगीण प्रगती करून घेण्याची एकमात्र शक्ती प्रार्थनेत आहे. परंतु प्रार्थनेत ती शक्ती प्राप्त करून घेताना मूळ आडकाठी निर्माण होते. ती लाजाळूपणाची आपल्याला आपल्याच मनाला सशक्त करणाऱ्या साधनाची लाज वाटते; परंतु अनेक थोर पुरुषाची ती मूळशक्ती ठरली आहे. पूज्य बापूजी गाधी म्हणायचे की, प्रार्थना ही मेरा जीवन है।" आणि त्याच्या अहिंसक, सात्त्विक आंदोलन सत्याग्रहीना वामनाच्या पावलाचे व्यापकत्व प्राप्त व्हायचे. त्यांनी प्रार्थनेने कमावलेले चारित्र्य बंदूकधारी इंग्रजांना नमवते झाले. याबद्दलचा स्वानुभव सांगताना 'अग्निपख' या आपल्या आत्मचरित्रात आपले माजी राष्ट्रपती मा. ए. पी. जे. अब्दुल कलाम म्हणतात की, मी जगप्रसिद्ध नासा संस्थेत अवकाश अभ्यासाला जाणार होतो. त्याआधी मला माझ्या वडिलांनी विशेष नमाजासाठी नेले. तेव्हा जाणवले की, प्रार्थनेमध्ये मनाला नवनव्या कल्पनांना जन्म देणारी, सृजनशक्ती चेतवायची शक्ती आहे, असा माझा विश्वास आहे. यशस्वी जीवनासाठी जे जे संचित माणसाला गरजेचे आहे, ते सर्व आपल्यामध्ये आधीच असते, नवनव्या कल्पना निद्रिस्त अवस्थेत आधीच आपल्या मनात असतात. त्या जाग्या होतात, मुक्त होतात. त्यांना कष्टाचे खतपाणी घालून आपण सत्यात उतरवतो, तेव्हा त्यातून यशाची निर्मिती होते. निर्माणकर्त्यांनी आपल्या मनामध्ये ज्या ज्या शक्ती गुप्त स्वरूपात साठवून ठेवल्या आहेत, त्यांना प्रार्थनेमुळे उत्तेजना मिळते आणि आपल्या दृश्य मनात त्यांची जाणीव होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा