epranali

This is educational blog.

Res

Breaking news

रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

सदाचार

                     सदाचार 



एका शहरात बहुमोल चंदनाचा रत्नजडित पेला उंच खाबावर टांगून ठेवला होता. खांबाखाली लिहिले होते की, जो कोणी साधक किंवा सिद्धयोगी या पेल्याला हात न लावता केवळ चमत्काराने किंवा योगशक्तीने खाली आणेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या जातील. गौतम बुद्धाचा शिष्य कश्यप तेथून जात असताना त्याने तो मजकूर वाचला. दूर उभे राहून मंत्रशक्तीने त्याने तो पेला हातात खेचला पहारेकरी व सर्व प्रेक्षक चकित झाले. कश्यपाच्या मागे मागे ते बौद्ध विहारात आले लोकाची खूप गर्दी जमली होती. 'भगवान बुद्ध की जय' अशा घोषणा सुरू झाल्या. कश्यप बुद्धाचा शिष्य होता, बुद्ध स्वतः कश्यपाजवळ आले. एका झटक्यात त्यांनी तो पेला जमिनीवर आपटून त्याचे तुकडे तुकडे केले. नंतर सर्व शिष्याना संबोधित ते म्हणाले, "मी तुम्हाला चमत्काराच्या मागे लागू नका म्हणून वारवार बजावले आहे. जर अशा मोहक, आकर्षक व वशीकारक चमत्कारानी तुम्ही लोकांना प्रभावित करणार असाल तर तुम्हाला धर्म कळला नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. जर तुम्हाला स्वतःचे कल्याण साधावयाचे असेल तर चमत्कार सोडून द्या. सदाचाराचा अभ्यास करा. " सदाचार हाच संसारातील महान चमत्कार आहे.' साधनेचा उद्देश प्रसिद्धी नसून सिद्धीद्वारे आत्मशुद्धी हा आहे. धर्म ही शब्दाची रास, कर्मकांडाची आरास किंवा ज्ञानाची मिरास सदाचाराची कास आहे. नसून  ती एक सदाचाराची कास आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा