epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

परीस व लोखंड

               परीस व लोखंड



एक वीर पुरुष लढाईमध्ये मृत्युमुखी पडला. त्याची म्हातारी बायको अतिशय गरिबीमध्ये दिवस घालवीत होती ते बघून बिरबलाला खूप वाईट वाटले बिरबल त्या म्हातारीला म्हणाला, "आजी, तुमच्या नवऱ्याची गंजलेली आणि निरुपयोगी असलेली तलवार घेऊन उद्या दरबारात या आणि मी सांगतो तस करा" ठरल्याप्रमाणे म्हातारी आजी दुसऱ्या दिवशी दरबारात आली आणि ती तलवार बादशहासमोर ठेवत म्हणाली, "महाराज, माझ्या शूर आणि हुशार नवऱ्याची ही एवढीच एक आठवण आहे. मी इतके दिवस तो जपून ठेवली आहे. पण आता माझे वय झाले आहे. मी केव्हा जाईन ते सांगता येत नाही, म्हणून सांगते, 'ही मौल्यवान वस्तू आपण आपल्याजवळ ठेवा" बादशहाने ती तलवार हातात घेऊन बघितली, पण ती परत म्हाताच्या आजीकडे देऊन म्हटले, 'बाई, ही गंजलेली तलवार काही उपयोगाची नाही. मग आमच्याजवळ ठेवून तरी तिचा उपयोग काय? आपण ही परत घेऊन जाणच योग्य आहे.' बादशहाचे बोलणे ऐकून म्हातारीबाई खूप निराश झाली आणि दरबारातून जाण्यासाठी म्हणून निघाली ते बघून बादशहाला तिची दया आली. त्याने खजिनदाराला पाच मोहरा म्हातारीला देण्याचा हुकूम सोडला. इतक्यात दरबारामध्ये "अरेरे फार वाईट हे ! च् च् च् |" असे उद्गार ऐकू आले. ते बिरबलानेच म्हटले होते. ते ऐकून बादशहा पटकन बिरबलाला म्हणाला, "क्या हुआ बिरबल?" "महाराज !" बिरबल उत्तरला, "दगड असलेला परीस, पण त्याच्या नुसत्या स्पर्शानेसुद्धा लोखडाचे सोने होते, पण या तलवारीचं पहा तलवारीला आपला स्पर्श होऊन ती तशीच राहिली. म्हणजे एके काळच्या शूर सरदाराची ही पत्नीसुद्धा किती दुर्दैवी आहे ? हा विचार माझ्या मनात आला. त्याच मला फार वाईट वाटलं ।” बिरबलाचे बोलणे ऐकून त्याला काय म्हणायचे आहे, ते बादशहाला चांगलेच समजले आपल्याकडच्याच शूर सरदाराच्या पत्नीला अशा परिस्थितीत दिवस काढावे लागत आहेत, हे बादशहा समजला. त्यांनी खजिनदाराला सांगितले की, “त्या बाईची ही तलवार आपल्याकडे ठेऊन घ्या आणि तिच्या वजनाएवढे सोन या बाईला बादशहाचा हुकूम ऐकून म्हाताऱ्या बाईला आणि बिरबलाला दोघानाही आनंद झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा