epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

आधी लगीन कोंढाण्याच

        आधी लगीन कोंढाण्याच



     राजगडावरील आपल्या वाड्याच्या सदरेवर बसलेल्या माँसाहेब एकदा कोंढाणा गडाकडे बोट दाखवून म्हणाल्या, "शिवबा इथून अवघ्या सहा कोसावर असलेला काढाणा मोगलाच्या हाती असण ही गोष्ट स्वराज्याला घातक नाही का?" शिवप्रभू म्हणाले, "माँसाहेब तुमचे म्हणणे मलाही पटते, परंतु त्या गडाची तटबंदी अतिशय भक्कम असून त्याचा पराक्रमी किल्लेदार हा आपल्या अडीच तीन हजार सैनिकानिशी गडाचे रक्षण डोळ्यात तेल घालून करीत असतो. अर्थात तो गड जिंकणे तेवढेसे सोपे नसले, तरी चार-पाच दिवसात तानाजींची भेट घेऊन तुमची इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य ती कारवाई करतो." तानाजी मालुसरेचे नाव घ्यायला आणि ते तिथे यायला एक गाठ पडताच माँसाहेब म्हणाल्या, तानाजी तुला शंभर वर्षे आयुष्य आहे. शिवबान तुझ नाव काढताच तू पुढे हजर मुजरा करून तानाजी म्हणाला, 'माँसाहेब' नुसत्या लांबलचक आयुष्यात मला खरोखरीच गोडी नाही. तसे कावळे व कासवसुध्दा म्हणे शेकडो वर्षाच आयुष्य जगतात आपल्याला विजेसारख क्षणभर झळाळून, पण घनदाट अंधकार उजळून नाहीस व्हावस वाटत पण माँसाहेब, आपल्याला माझी आठवण कशाच्या संबंधात आली होती ? शिवप्रभू म्हणाले, "तानाजी गड कोंढाणा मोगलांच्या हाती असण स्वराज्याला धोक्याच असल्यानं तो लवकरात लवकर आपल्याकडे यावा अशी माँसाहेबाची इच्छा आहे. पण अगोदर तू मध्यच इकडे का आलास ते साग ! हाती घेतलेल्या मोत्याच्या अक्षता आपल्या बाराबदीच्या खिशात टाकीत तानाजी म्हणाले, "राजे परवाच्या मुहूर्तावर माझा मुलगा रायबा याचं लग्न करायच ठरवल होत, पण दुसरे महत्वाच लग्न अगोदर करायच ठरल्यामुळे ते लग्न पुढे ढकललं." शिवप्रभू व माँसाहेबांना तानाजीच्या या बोलण्याचा अर्थ समजताच, रायबाच लग्न अगोदर उरकाव हे त्यांना सांगण्याचा बराच प्रयत्न केला, पण तानाजी म्हणाले, "आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाच." तानाजी मालुसन्यांनी मुलाचे लग्न पुढे ढकलल्याचे घरी कळविले शेलारमामा व धाकटा भाऊ सूर्याजी याना ताबडतोब राजगडावर निघून येण्यास सांगितले व स्वत ते गोंधळ्याच्या वेषात कोंढाण्यावर जाऊन, तिथल्या सुरक्षाव्यवस्थेतील कच्चे दुवे टेहेळून परत राजगडी आले मग एका मध्यरात्री पाचशे निवडक मावळ्यांसह नरवीर तानाजी कलावतिणीचा बुरूज व हनुमान बुरूज यांमधील गनिमाचा पहारा नसलेल्या कड्यावरून दोरखडाच्या माळेच्या साहाय्याने कोंढाण्यावर चढले व त्यांनी तिथल्या मोगल सैनिकाचे शिरकाण सुरू केले. या हातघाईच्या लढाईत तानाजी विजयी झाले पण व उदयभानूच्या तलवारीला बळी पडले. शेलारमामानी उदयभानूलाही ठार केले व कोंढाण्यावर भगवे निशाण फडकावले. गडावर शेलारमामांनी गवताची गजी पेटवून गड सर केल्याचे महाराजांना कळविले. पण जेव्हा महाराज कोंढाण्यावर आले व त्यांना तानाजी कामी आल्याचे कळले, तेव्हा ते शेलारमामांना दुखद स्वरात म्हणाले, "मामा गड आला, पण माझा सिंह गेला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा