epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

खरे बोलणारा मोहन'

         'खरे बोलणारा मोहन



            संध्याकाळची वेळ होती. मोहन घरात शिरला हातपाय धुतले आणि स्वयंपाक घरात गेला. पुतळीबेन खिचडीच्या भांड्यावर झाकण ठेवत होत्या. मोहनला पाहताच त्या म्हणाल्या, 'मोहन । काल दुपारी वैष्णव मंदिरात गेला होतास ना?' होय... मोहनने एकाच शब्दत उत्तर दिले. 'तुझ्याबरोबर कोण होते? 'मित्र होते माझे. .' 'देवळाच्या मागच्या पडवीत तुम्ही किती वेळ होता?' 'थोडा वेळ बोलत बसलो होतो. बा...' 'आणि बोलताना काय चालल होत?...' मोहन गप्प बसला. पुतळीबेन पुन्हा कडक शब्दात ओरडल्या... 'सांग खरं खरं! | लपविण्याचा प्रयत्न करून नकोस...' 'काही काही ना काही नाही । 'उसनी हिंमत आणून मोहन बोलला. पण, तो घाबरला होता. पुतळीबेन | दरडावून बोलत होत्या. त्या म्हणाल्या. 'मोहन तू आणि तुझ्या बरोबरच्या पोरांनी तिथे बिड्या ओढल्या...! रिकाम्या गप्पा चालल्या होत्या तुमच्या खर आहे ना? मोहन आणखी घाबरला... आईला तो घाबरत होता त्यापेक्षाही अधिक भीती त्याला बाप्पांची वाटत होती. बाप्पा तसे | मायाळू होते. मोहनचे लाड करीत असत, परंतु ते रागीट स्वभावचेही होते. चूक झाल्यावर ते लाड बाजूला सोडतील आणि मारतील हे मोहन ओळखून होता. त्याने पुन्हा एकदा हे खोटे आहे असे पटविण्याचा प्रयत्न करून | पाहिला परंतु लगेच पुतळीबेन ओरडल्या 'मावजीभाईनी तुम्हा पोराना हटकले. काय करता रे म्हणून विचारले... तेव्हा तोंडातला धूर कसाबसा सोडून तू बिडी पायाखाली दाबलीस. खरय् ना? मोहनला गुन्हा कबूल करणे भागच होते. त्याच्या डोळ्यात पाणी आले. तो आईच्या गळ्यात तू पडला रडत रडतच तो म्हणाला...'बा चुकलो मी पुन्हा कधी कधीसुध्दा बिड्या ओढणार नाही. बाप्पांना सांगू नकोस...! तुला मी वचन देतो.' हुंदका देऊन मोहन पुढे बोलला 'खोटे बोलून मी तुला फसविणार होतो. परंतु खोटे लपत नसते. खऱ्याचा पुरावा समोर येतोच. मी आता वाईट वागणार नाही. अन् खोटेही बोलणार नाही' पुतळीबेन गहिवरल्या त्यांनी मोहनला पोटाशी धरले. डोक्यावरून, गालावरून हात फिरविला. त्याला मायेने म्हणाल्या, 'बेटा आपल्या घराण्यात कोणी वाईट वागले नाही. सत्य सोडले नाही. मोठ्या माणसांचे ऐकून सगळी कामे व्यवस्थित करणारी मुलेच | नेहमी आई-वडिलांना आवडतात. तू नीट वागशील ना?' मोहनने मान हलविली. त्याचे डोळे पाणावले. त्याने मनात पक्के ठसविले. यापुढे कधी सुध्दा खोटे बोलायचे नाही. खरे असेल तेच बोलायचे."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा