epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

मकरसंक्रांत

              'मकरसंक्रात 



           मकरसंक्रात हा पौष महिन्यातील सर्वात मोठा सण आहे. संक्रांतीच्या सणाला धार्मिक, सामाजिक आणि नैसर्गिक आरोग्यदृष्ट्या फारच महत्व आहे. मकरसंक्रांतीचे परिणाम सान्या जगावर पडतात. अशी संक्रांत होणारा हा पौष महिना अनेक दृष्टींनी विशेष असा आहे. आणि म्हणून त्याला महत्त्वही विशेष आहे. पृथ्वीच्या मूर्याचे किरण लंबरूपाने पडतात असे आपण म्हणतो, पण विषुववृत्ता साडेतेवीस अक्षांशापासून तो दक्षिणेस साडेतेवीस अक्षाशावरील मकरवृत्तापर्यंत एकदर सत्तेचाळीस अक्षाशाचा पट्टा इष्ण कटिबंधा आहे. या पट्ट्यात याची इष्णता क्रमाक्रमाने प्रखर भासत असते. विषुववृत्त प्रदेशात ती जास्त तीव्र असते. एवढेच आषाढ महिन्यात सूर्य इतर गोलार्भातील असतो. तेथून तो दक्षिणेकडे भ्रमण करतो. त्या वेळी दक्षिणायन सुरु झाले असे आपण म्हणतो त्यावेळी आपणाकडे इन्हाळा असून रात्रीपेक्षा दिवस मोठा असतो. नंतर सहा महिने हळूहळू दक्षिणेकडे सूर्य जातो आणि पौष महिन्यात तो दक्षिण गोलार्धांमधील मकरवृत्तावर जातो. त्यामकरसंक्रांतीला सूर्य पुन्हा इतरेकडे सरकू लागतो. त्यावेळी उत्तरायण सुरु झाले असे आपण म्हणतो. यावेळी आपल्याकडे हिवाळा असून दिवसापेक्षा रात्र मोठी असते. पौष महिन्यात म्हणजे सूर्याच्या इत्तरायणाची सुरुवात असते. मकरसंक्रांतीच्या वेळी आपण इतर गोलार्धातील लोकांना हिवाळा चांगलाच जाणवतो अशा वेळी अंगात उष्णता टिकवून धरणारे पदार्थ खाण्याची प्रथा आहे. गुळाची पोळी लोण तूप, तीळ, बाजरीची भाकरी, मुगाची खिचडी, गाजरे, बागी वगैरे पदार्थ भोगीच्या दिवशी आणि संक्रातीच्या मणाला मुद्दाम खातात अगदी पहाटे जेवण करून धनुर्मासाची समानी करतात. शरीर पोषणासाठी हा आहार या वेळी फारच इपयुक्त ठरतो. मकरसंक्रांतीच्या दिवशी लोक एकमेकांना तिळगुळ देतात आणि प्रेम वाढविण्यास विनंती करतात. तीळ हे स्नेहाचे प्रतीक आणि गूळ हे गोडीचे प्रतीक झाले गेते सोडून देऊन या दिवसापासून नवे प्रेम धरावे आणि जीवन निर्मळ करून सुखी व्हावे हा या सर्व देवघेवीचा हेतू असतो खिया एकमेकींना सुपट देतात, त्या घटात ऊस, गाजरे, बोरे, भुईमुगाच्या शेंगा तिळगुळ बगैरे पदार्थ घालून हळदी-कुंकवाचा सार्वजनिक समारंभ मोठ्या निष्ठेने करतात. फळफळावळ, विविध वस्तू आणि संसारोपयोगी पदार्थाचे आवे तुटून श्रेष्ठ खानदान करतात. संक्रांतीचे हे विशेष समारंभ संस्कृतीसंवर्धनाला उपयुक्त आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा