epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

श्रमसाधना

                श्रमसाधना



"आई! मला कंटाळा आलाय या अभ्यासाचा!" श्रेयस आईला म्हणाला. "बाबा रे कसलाच कंटाळा ये देऊ नकोस, तुला कालइल या लेखकाची गोष्ट माहित आहे ना! त्याने फ्रेंच राज्यक्रांतीच्या इतिहासाचा पहिला खंड लिहून पूर्ण केला व मित आपल्या मित्राकडे तपासून काही सूचना करण्याची विनंती केली" मिलच्या घरी जी मोलकरीण होती तिला वाटले, मालकांनी जळणासाठी रही आणली आहे. तिने ती सारी कागदाची लिहिलेली बंडले एका मागून एक चुलीत घातली आणि जाळून टाकली. जेव्हा कालांइलला हे वृत्त कळले त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर इठले. गांधीलमाशांचे थवे आपला मेंदू पोखरत आहेत असे वाटले मिलच्या संतापाला पारावार उरला नाही. निरक्षरतेने ओढविलेले हे वैचारिक वादळ होते. अडाणी मोलकरणीला दोष देणे दोघांनाही प्रशस्त वाटले नाही. जीवनभर केलेल्या कष्टांची राख झाली होती. यापुढील सारे जीवन दारिद्रयात पिचत घालवावे लागणार या विचाराने त्याचे डोके भणाणून गेले. पुस्तक लिहिण्यासाठी काढलेली महत्वाची टिपणे त्याने पुस्तक पूर्ण झाल्याच्या आनंदात फाडून टाकली होती. जीवनातील खोल निराशेच्या खाईत तो लोटला गेला. त्याला आता विलक्षण थकवा आला होता. सारे पुन्हा लिहून काढणे त्याच्या शक्तीबाहेरचे काम होते. भग्न हृदयाने तो आपल्या घराच्या खिडकी समोर इभा राहिला. खिडकीतून त्याला काय दिसत १? एका नव्या इमारतीचे बांधकाम चालू होते. काही गवंडी विटांची भिंत बांधण्याचे काम करीत होते. विटेवर वीट चढत होती. बिटांची रांग तयार होत होती. रांगेवर रांग चढत होती. भिंतींची उची वाढत होती. इमारत पुरी होण्याच्या मार्गावर होती. कार्लाइल पाहात होता. डोक्यात आवर्त प्रत्यावर्त वारे वाहत होते. प्रेरणा मिळत गेली. कालांइल पुन्हा फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास लिहायला बसला. त्याने पेन उचलला. स्मृती जागृत झाली. पुन्हा शब्दामागून शब्द आठवत गेले. वाक्ये तयार होत गेली. परिच्छेदांमागून परिच्छेदांनी पाने भरत गेली. पुस्तक पूर्णतया जसेच्या तसे तयार झाले. वाङ्मय जगतात कार्लाइलच्या परिश्रमाच्या यशोदुंदभी वाजू लागल्या. कामाचे सातत्य म्हणजे व्यावहारिक शिक्षण, अनुभवाची प्रतिष्ठा, सर्वोत्कृष्ट कलाकृतीची यशस्विता, शिस्तबद्ध जीवनाची आखणी, आत्मसंयमाची शिकवण, एकाग्रता, मन:शांती, कामाचा पाठपुरावा करणारी कार्यशक्ती, ज्ञानाची खोली वाढविणारे सदानंदी जीवन हे अन्य व्यक्तीलाही प्रेरणादायक ठरते. कामाचे ओझे इचलणे म्हणजे एक शिक्षाच वाटते, पण ती शिक्षाच वैभव आणि प्रतिष्ठा मिळवून देते. म्हणून बाळ! कामाचा कधी कंटाळा आला म्हणू नकोस." श्रेयसच्या आईने श्रद्धाने छान गोष्ट सांगितली, म्हणून मिलिंद श्रेयसचे वडील मनातल्या मनात हसत होते. ते आपले हिशोबाचे काम करण्यात गर्क होते. श्रुती कान देऊन ऐकत होती. श्रेयस पुन्हा अभ्यासाला बसला होता. स्वयंपाकघरात नाश्त्याची तयारी करायला श्रद्धाने सुरुवात केली होती. सर्वांनीच आपापल्या कामाचा वाटा उचलला तर घरात सुख, शांती आणि समाधान नांदते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा