epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

विठ्ठल रामजी शिंदे

               "विठ्ठल रामजी शिंदे'



        (जन्म २३ एप्रिल १८७३- मृत्यु २ जानेवारी १९४४) अस्पृश्यता निवारणाची नांदी अस्पृश्यता हा हिंदू समाजाला लागलेला कलक आहे. चातुवर्ण्य समाजव्यवस्थेचा इगम भगवद्गीतेत आहे. जातीयता ही हिंदूधर्माची दुसरी दुर्बलता आहे. इंग्रजांनी याच इणिवेचा फायदा घेतला व भारतात एकछत्री साम्राज्य इमारले जेव्हा भारताच्या राजकीय स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला. तव्हा या इणिवा समाजनेत्यांच्या लक्षात आल्या विठ्ठल रामजी शिंदे हे त्याचे अग्रदूत १९१७ साली त्यांनी अनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात हा ठराव आणला. विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म २३ एप्रिल १८७३ साली जमखिडी येथे झाला. त्यांचे वडील रामजीबाबा हे संत तुकारामांचे भक्त 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमगळ' ही तुकोबांची शिकवण घरात जातीभेद नव्हता १८९१ साली ते मॅट्रिक झाले महाविद्यालयातील शिक्षणासाठी पुण्यास आले त्यांची बहीण जानक्काही त्यांच्या समवेत राहिली. १८९८ साली ते बी.ए. झाले. १९०१ साली मँचेस्टरला गेले. त्यांनी युरोपच्या सहली करून इंग्लड, स्कॉटलंड, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटली देश पाहिले त्या देशातील लोकशिक्षण पाहिले कुटुबसस्था, शिक्षणसंस्था, समाजसंस्था पाहिल्या विद्वानांच्या गाठीभेटी घेतल्या प्रौढत्व, बुद्धिमत्ता, अनुभव समृद्धता, धर्मज्ञान याचा सुंदर समन्वय त्यांच्या जीवनात होता २५ डिसेंबर १९२० रोजी नागरपूरला म गांधींच्या अध्यक्षतेखाली अ भा अस्पृश्यता निवारण परिषद भरली होती या परिषदेस प. मोतीलाल नेहरु राजगोपालाचार्य, जमनालाल बजाज, वल्लभभाई पटेल इ मान्यवर हजर होते. अशा प्रकारच्या परिषदा, भाषणे विठ्ठल रामजींच्या प्रेरणा प्रयत्नाने भारतभर होत राहिल्या मॅचेस्टरला जाण्यापूर्वी ते एल एल. बी. झाले होते. ब्रिटिश अॅण्ड फॉरिन असोसिएशनची शिष्यवृत्ती डॉ. भांडारकर (प्रार्थनासमाज) यांच्यामुळे मिळाली प्रार्थनासमाज व ब्राह्मोसमाजाचे प्रशस्तीपत्रक त्यासाठी लागे त्याचा लाभ विठ्ठल रामजींना मिळाला. १९१२ साली श्रीमत तुकोजीराव होळकर यांनी दिलेल्या २० हजार रुपयांच्या देणगीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच नावे वसतिगृह बाधले. दीडतप त्यानी या मिशनचे कार्य केल त्यानंतर ब्राह्मो समाजाने त्यांना मंगळूर कार्यालयात आचार्य म्हणून पाठविले. श्रावणकोर संस्थानातील बायक्कम मंदिर प्रवेशासाठी त्यांनी सत्याग्रह केला; पण ब्राह्मोसमाजाच्या कार्यकत्यांशी मतभेद झाले. त्यानी आचार्यपदाचा राजीनामा दिला. कार्यकर्त्यांनी महर्षीना आग्रहपूर्वक पुण्यास नेले. १९२५ साली अहिल्याश्रमाच्या नवीन वास्तूचे इद्घाटन झाले ते पुणेकर झाले. १९३० सालच्या कायदेभंगाच्या आंदोलनातही ते सामील झाले. जनजागरण दिंडी काढली प्रार्थनासमाजाला पदयात्रेची दीक्षा दिली त्याना १८ मे १९३० मध्ये अटक झाली. वयाने सत्तरी ओलांडली होती. शरीर थकले होते. कंपवात सुरु झाला होता. हातपायांना कंप सुटू लागला. त्या अवस्थेतही त्यांनी आपल्या आठवणी लिहून काढल्या राजकारण, समाजकारण १९३३ नंतर संपले होते. शेवटची १३ वर्षे पुणे येथे काढली ठक्करबाप्पा, भाऊराव पाटील वगैरे अनेक लहानथोर समाजसेवक येऊन भेटून गेले. विठ्ठल विटेवर उभा होता. २ जानेवारी  १९४४ रोजी ते वैकुंठवासी झाले जनता जनार्दनाने फुल्यांना महात्मा ठविले तर विठ्ठल रामजींना 'महर्षी' पदवी बहाल केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा