epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

वेळेचे महत्व

                    'वेळेचे महत्त्व'



    - वेग किंवा गती यामुळे आधुनिक जीवन धावपळीचे झालेले आहे. झपाट्याने होणारे शहरीकरण, उद्योगधंद्यांची अविरत वाढ आणि विज्ञानाच्या प्रगतीबरोबर निर्माण होणाऱ्या विविध समस्या या आता नित्य भेडसावरणाच्या गोष्टी 'थांबला तो संपला' हे आता नेहमीच लक्षात ठेवावे लागत आहे. कुणाला कशाची उसंत नाही. उसंत घ्याल तर स्पर्धेतून बाजूला फेकले जात असे काळ सांगतो आहे. गाडी पकडणे, कार्यालयात वेळेवर पोहोचणे, रहदारीची समस्या लक्षात घेऊन वेळेचे नियोजन करणे आणि दर क्षण वेळेचे भान ठेवणे आता अत्यावश्यक होऊन बसलेले आहे. काळाच्या गतीचा कायदा सर्वांनाच पाळावा लागतो असा काळ आहे. म्हणून वेळेचे नुसते भान आहे. एवढ्याने आता भागणार नाही तर वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. म्हणून वेळेचे नुसते भान आहे एवढ्याने आता भागणार नाही तर वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. तेव्हा, वेळेचे भान, त्यानुसार नियोजन आणि नियोजननुसार वाटचाल हा यशाचा मंत्र आहे यालाच आपण वक्तशीरपणा असे आधुनिक काळात मानले जाते. वेळेचे मोल पैशाहून अधिक आहे असे मानतात. आपण वक्तशीरपणे वागले नाही तर आला क्षण गेला क्षण, होती काही राहिले नाही वेळ नाही । पाळणार तर, हाती काही इरले नाही असे म्हणून हात चोळीत आपल्याला बसावे लागेल. आहेत. जीवनसंघर्ष दिवसेंदिवस अटळ होत आहे. एकदा अमेरिकेचे प्रख्यात संशोधक, राजनितीज्ञ आणि दार्शनिक बेंजामिन फ्रँकलिन यांचे एक पुस्तकाचे दुकान होते. एकदा एक ग्राहक दुकानात शिरले. बरीच पुस्तके बघितली, शेवटी एक पुस्तक निवडले. या पुस्तकाची किंमत काय आहे? त्याने दुकानातील नोकराला विचारले. एक डॉलर नोकराने उत्तर दिले. या पुस्तकाची किंमत थोडीही कमी होणार नाही का? ग्राहकाने दुसरा सवाल केला. पुस्तकाची किंमत कदापि कमी होणार नाही, नोकराने उत्तर दिले. दुकानाचे मालक फ्रँकलिन कोठे गेले आहेत, मला त्यांना भेटायचं आहे नोकराने कॅबिनकडे बोट दाखविले व फ्रँकलिन आत बसल्याचे सांगितले. ग्राहक कॅबिनमध्ये घुसला, त्याने फ्रँकलिनला नमस्कार केला. हातातील पुस्तक फ्रँकलिन यांना दाखवीत ग्राहकाने या पुस्तकाची किंमत थोडीही कमी होणार नाही का? सवाल केला. पुस्तकाची किंमत सव्वा डॉलर आहे, फ्रँकलिन म्हणाले. आता तर तुमच्या नोकराने पुस्तकाची किंमत एक डॉलर सांगितली, ग्राहक म्हणाले. पाव डॉलर ही माझ्या वेळेची किंमत आहे. शेवटी पुस्तकाला किती पैसे द्यावयाचे? ग्राहकाने फ्रँकलिनला विचारले. दीड डॉलर फ्रँकलिनने लगेच उत्तर दिले. तुम्ही जितका वेळ माझा घालवाल, तितकी किंमत त्या पुस्तकाची वाढत राहणार आहे, हे लक्षात घ्या. पुस्तकाची किंमत वाढते ती माझ्या वाया घातलेल्या वेळेबद्दल ग्राहकाने पुस्तकासाठी दीड डॉलर मोजले व तो दुकानाबाहेर पडला. वेळ वाया घालविल्याबद्दल त्याला पुस्तकासाठी एक डॉलरसाठी दीड डॉलर मोजावे लागले. वेळेचे महत्व किती असते, हे आपल्यालाही कळावयास हवे.

1 टिप्पणी: