epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

करुणासागर हवा आहे

          'करुणासागर हवा आहे. 



    भारतात अनेक प्रकारे देवाची इपासना केली जात असे. कोणी भगवान सूर्यनारायणाची उपासना करी. - देवोतव वरदान देत. कोणी वरुणाचा इपासक, कोणी अशीचा इपासक, कोणी इंद्राचा तर कोणी चंद्राचा अशा रीतीने उपासना करून स्वर्णमाली होई. स्वर्गात देव राहतात. अप्सरांचा नाच पाहतात. सोमरस अमृतासारखी पेये पितात. कामधेनू आहे. कल्पवृक्ष आहे. स्वर्गात सुख, अमन, आहे. स्वर्गाविषयी लोकांच्या अशा अनेक कल्पना कोणी ज्ञानमार्ग ही उपासना सांगतो. कोणी कर्मयोग्याची शिकवण देतो. कोणी भक्तीमार्ग व स्वर्गाचे प्रलोभन हे सर्वांनाच मोठे आकर्षण वाटते. असाच एक संत स्वर्गात गेला. देवदूतांनी त्याचे स्वागत केले. दुसरे अनेक संत तिथे होते. त्यांच्या डोक्यावर मुकुट शोभत होते. कुणाच्या डोक्यावर हिरे-माणकांचा, कुणाच्या डोक्यावर नीलमणी, फिरोजा. कुणाच्या डोक्यावर युरेनियमचा. या संताला सोन्याचा मुकुट देवदूताने दिला. संताने देवदूताला विचारले, "अरे हे काय? इवही पक्षपात ? अन्याय ? आश्चर्य आहे!" तो गाला देवदूत म्हणाला, "कोणता अन्याय?" इस काहीजणांना हिरे-माणकाचे, काही जणांना पाचू, नीलमणी, फिरोजा अशा मूल्यवान रत्नाचे मुकुट पण मला मात्र फक्त सोन्याचा मुकुट ?" "महाराज! हे पृथ्वीवरील अश्रू आहेत. स्वर्गात अश्रूंचे मोती मिळतात. 'दया' धर्म का मूल है । गरीबांच्या झोपडीत राहून ज्यांनी त्यांची सेवा केली. भुकेल्या प्राण्यांना स्वतः इपाशी राहून खायला दिले. कोडी-अपंग माणसांच्या जखमा धुतल्या. वृद्ध-पित्यांची निरपेक्ष भावनेने सेवा केली. जखमी माणसांच्या जखमा धूवून औषध लावले. कुत्री, मांजरे, गाय, बैल यासारख्या मूक जनावरांना खाऊ घातले पाणी दिले, दुःखी प्राण्यांचे दुःख पाहून ज्यांच्या डोळ्यात अश्रू इभे राहिले. अनाथ पोरक्या मुलांना पोटाशी धरून कुरवाळले. दासांना आणि पुत्रांना समान वागणूक दिली. रंजल्या गांजल्या माणसांना प्रेमाने पोटाशी धरले. अशा प्रकाराने ज्यांनी मानवाची व प्राणीमात्रांची सेवा केली अशा दया माणसांना स्वर्गात स्थान मिळते. तिथे धरतीवरील अशा दया भावनेने जे अश्रू ओघळतात त्यांना स्वर्गात रत्नांचे रूप मिळते व ते अश्रुच त्यांना रत्नरुपाने परत मिळतात. पोप पॉल सहावे यांनी मदर तेरेसाला बोलावले व तिला आणि तिच्या मदतगार सेविकांना म्हणाले, “रोममधील झोपडपट्टीत जाऊन तुम्ही त्या स्वच्छ करण्याचे काम करा" इवं आम्ही अनेकजणी अशाच कामाशिवाय आहोत त्याच काय?" असे असेल तर काम कुठे कुठे करायचे ते मी दाखविते, मदर तेरेसा म्हणाली खरं म्हणजे भारतात सेवेच एवढ प्रचंड काम पडलं की इथे 'बेरोजगारी' हा शब्द निरर्थक ठरतो. नोकरी नाही म्हणून वणवण हिंडत बसू नका. सेवेच्या वाटांवर तुमची वाट पाहणारे अनेक धनिक उभे आहेत. त्यांना नोकर नको आहेत. सेवक हवे आहेत. डोळे दिले आहेत. दयार्द्र दृष्टीने पहा. हात दिले आहेत, काम करा. कान दिले आहेत, संतांच्या कथा ऐका. तोंड दिले आहे, मधुर बोला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा