epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

एक वास्तववादी विचार

          एक वास्तववादी विचार 



 → कथाकथन गौतम बुद्ध सामान्यतः पारलौकिक प्रश्नाची चर्चा टाळत असत. माणसाच्या खऱ्याखुऱ्या प्रश्नांकडं लक्ष दयावं त्यांना प्राधान्य द्या, असा एक वास्तववादी विचार हा त्याच्या तत्त्वज्ञानाचा पाया होता. या संदर्भात त्यांच्या आयुष्यात घडलेली एक कथा आपले मन खेचून घेणारी आहे मालुक्यपुत या नावाचा त्याचा एक शिष्य होता त्याने त्या काळाला अनुसरून त्यांना काही प्रश्न विचारले मृत्यूनंतर आत्मा असतो की नाही हे जग ईश्वरान निर्माण केला आहे की नाही, यांसारखे हे प्रश्न होते हे प्रश्न विचारताना त्याने काहीसा उद्धटपणाही केला तुम्ही मला या प्रश्नाची उत्तरे दिली नाहीत तर मी दुसऱ्या गुरूच्या शोधात जाईन, असतो त्यांना म्हणाला तेव्हा बुद्धांनी त्याला आधी एक प्रश्न विचारला,तु माझ्याकडं आलास तेव्हा या प्रश्नांची उत्तर देईन, असे आश्वासन मी तुला दिल होत काय? तो नाही असे म्हणाला, त्यावर बुद्ध पुन्हा म्हणाले, माझ्याकड मग धमकी कशाला देतोस? तरीही एक कल्पना का, की एखाद्या जंगलातून कुणी तरी मारलेला बाण एकाच्या शरीरात घुसला आहे. त्याचे मित्र, नातेवाईक आहेत. त वैद्याला बोलावून बाण काढायचा, उपचार करायचे, असे म्हणत आहेत. एवढ्यात तो त्यांना म्हणतो. थांबा, वैद्याला बोलवू नका जंगलात जाऊन हा बाण कुणी मारला, ते शोधून काढा ते कळल की मग खुशाल वैद्याला बोलवा आणि माझ्यावर उपचार करा नका आधी जगला मित्रांनी आणि । नातेवाइकांनी काय कराव आधी जंगलात जाऊन बाण मारणान्यांचा शोध घ्यावा की आधी त्याच्यावर उपचार करावेत ? 'आधी त्याच्यावर उपचार करून त्याचे प्राण वाचवायचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे आधी बाण मारणाराचा शोध घेत बसला तर जंगलात तो जिथं कुठ लपला असेल, तिथून त्याला शोधून काडेपर्यंत जखमी माणसाचे प्राण जातील म्हणून त्याचे प्राण वाचवण्यालाच अग्रक्रम दिला पाहिजे त्याच हे उत्तर ऐकूल बुद्ध त्याला म्हणाले, तू सांगितलेला अग्रक्रम बरोबर आहे. आपल्या जीवनकार्याच्या बाबतीतही असाच अग्रक्रम आहे. हेही त्यांनी स्पष्ट केलं पारलौकिक प्रश्नांची उत्तर शोधत बसलो, तर पिढयान पिढ्या जातील. पण त्या प्रश्नाची समाधानकारक उत्तर मिळतीलच अस नाही. म्हणून माझ्या दृष्टीन पारलौकिक प्रश्नापेक्षा माणसाच्या दुःखाचा प्रश्न महत्वाचा आहे, असा त्यांच्या बोलण्याचा आशय होता गुळगुळीत पांढऱ्या कागदावर रंगीबेरंगी छपाई करून सामान्य माणसाची वेदना बोलकी करता येत नाही वर्तमानपत्राची रंगीत पान हा त्या वृत्तपत्रांचा शृंगार आहे. सौंदर्य नाही. जी बातमी बोलकी नाही, जिवंत नाही अशा बातम्यांना रंगीबेरंगी करून वाचकांना आकर्षित करता येत नाही रंगीबेरंगी पाने हे वृत्तपत्राचे अलंकार आहेत. अलकाराचा गुणधर्म असलेले सौंदर्य वृद्धींगत करणे हा आहे. नसलेले सौंदर्य निर्माण करणे नाही एखाद्या कुरुप महिलेने अंगावर जर अनावश्यक दागिने घातले तर ती किती कुरुप दिसते ते वेगळे सांगायची गरज नाही त्यामुळे वास्तवाला सोडून जे लिखाण प्रसिद्ध होते ते वाचकाला कधीही आकर्षित करीत नाही. वाचकांची नेमकी भूक काय आहे, बातम्यांचे नेमके विषय काय आहेत आणि जीवनाचे नेमके वास्तव काय आहे याचे चित्रण सर्वांनाच अंतर्मुख करणारे ठरते. मानवी जीवनाकडे पाहण्याचा गौतम बुद्धांचा हा वास्तववादी दृष्टिकोण आजच्या भारतीय समाजालाही खूप मार्गदर्शक ठरणारा आहे. आजचा आपला समाज अनेक गंभीर समस्यांनी ग्रासलेला आहे. अज्ञान आणि दारिद्र्य या तर अगदी मूलभूत स्वरूपाच्या समस्या आहेत. या दोन समस्यांचा परिणाम म्हणून निर्माण झालेले असंख्य गुंते आपल्याला कासावीस करीत आहेत. इथ आरोग्याची हेळसाड आहे. कुपोषण आहे. स्त्रियांच्या विकासासाठी आवश्यक ती पावल उचलण्यात अजूनही आपण फारसे यशस्वी झालेला नाहीत. त्यातच भाषा, जाती धर्म इ. मधील भेदामुळ परसराचा याची प्रवृत्ती वाढू लागली असून, त्यातून अनेकदा हिंसाचाराचा डोबही उसळत आहे. अशा वेळी आपण समाजात विवेकाची शहाणांची समजस्याची भावना वाढीला लावायला हवी पण आपण वास्तववादी झालो, तर हे घडेल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा