epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

आनंदाश्रु - तृप्ती व समाधान

         'आनंदाश्रु - तृप्ती व समाधान':



      कथा एका रशियन सैनिकाची आहे. त्यावेळी निकोलस हा रशियाचा बादशाह होता. तो रशियन हताश होऊन पहारा करीत होता चिंता, इदासीनता, खिन्नता एक होऊन त्याच्या मनात थैमान घालत होत्या. अखेर तो निराशेने बँकेमध्ये बसला कारण कर्जाच्या ओझ्याखाली तो पार चिरडून गेला होता, हे कर्ज कसे फेडायचे हाच त्याच्यापुढील बिकट प्रश्न होता. आपण कुणाकुणाचे काय काय देणे लागतो, किती देणे लागतो, याची त्याने एक लांबलचक यादी बनविली व प्रत्येकाच्या नावासमोर किती देणे आहे याची मांडली हातावर पोट असणारा भाडोत्री सैनिक पण कुटुंबवत्सल कृतज्ञ माणूस होता. पहारा करता करता त्याला झोप येऊ लागली म्हणून त्याने चिंताग्रस्त होऊन खाली लिहून ठेवले 'हे कर्ज फेडणार कोण?' - आणि त्याला गाढ झोप लागली. निकोलस त्या वाटेने राजवाड्यात निघाला. त्याने पहान्यावर झोपलेला सैनिक पाहिला. त्याने शेजारी पडलेला कागद पाहिला. देणेदाराची नावे आणि द्यावयाचे कर्ज रक्कम पाहिली. हे कर्ज फेडणार कोण? या प्रश्नाखाली 'निकोलस' अशी पेन्सिलीने सही करुन निघून गेला. थोड्या वेळाने त्याला जाग आली. तो इठला, त्याने आपण लिहिलेल्या कागदावर निकोलसने पेन्सिलीने सही केलेली पाहिली. त्याचा त्या कागदावरील सहीचा विश्वासच पटेना. आपण स्वप्न तर पाहत नाही ना? परंतु दुसऱ्या सकाळी त्याला हवी असलेली रक्कम खजिनदाराकडून मिळाली तेव्हा त्याला त्या स्वप्नाचा पडताळा येऊन तो कर्जमुक्त झाला व त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. अमेरिकेचा कनवाळू प्रेसिडेंट अब्राहम लिंकनची अशीच एक आख्यायिका आहे. गुलामगिरीचा कायदा रद्द व्हावा म्हणून त्याला यादवी युद्धाचा धोकाही पत्कारावा लागला पण तो आपल्या राजकीय विरोधी नेत्यांविषयी नेहमी सामंजस्यपूर्ण व मधुर शब्दात बोले त्याला असे बोलताना पाहून एकदा एका महिलेने संतापून विचारले, "त्यांना गोळ्या घालून ठार मारू न शत्रुत्व संपवून टाकता येत नाही का?" लिंकनने शांतपणे विचारले, “मॅडम मी गोड बोलून आणि ममतेने वागून त्यांना मित्र बनवितो म्हणजे शत्रुत्व नाहीसेच करीत नाही का?" बिथोवन हा एक उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक त्याने एका अंध मुलीला पाहिले ती पांढरे शुभ्र चांदणे पाहू शकत नव्हती. उगवत्या शुक्राचे विलोभनीय दर्शन घेऊ शकत नव्हती आकाशगंगेतील पांढऱ्या शुभ्र तारकाचा प्रकाशपट्टा पाहू शकत नव्हती. समुद्र लाटावर किरण पडून फेसाळणाच्या चांदीच्या रसाचा आस्वाद घेऊ शकत नव्हती. हिरव्यागार गवतावर पडलेल्या चंद्रकिरणांचा आस्वाद घेऊ शकत नव्हती. निसर्गसौंदर्याचे हे दैवी देणे त्याने काव्यबद्ध केले. सुंदर संगीतात तालबद्ध केले. मधुर शब्दात ते गुंफले आणि 'मूनलाईट सोनाटा' हे गाणे निर्मिले. ते सर्व जगभर गाजले अंतःकरणात मानवी भावनांची सहृदयतेची वेल रसरसून फुलली की अशी अद्वितीय एकमेव गीते निर्माण होतात व ती जग समरसून ऐकत राहते आणि अशा कलावंतांना रसिकाकडून दाद मिळते. तेव्हाही त्याच्या डोळ्यात तृप्तीचे समाधानाचे आणि कृतज्ञतेचे आनंदाश्रू उभे राहतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा