epranali

This is educational blog.

Res

Breaking news

सोमवार, १७ जून, २०२४

22 जून-विज्ञान दिनविशेष

              22 जून-विज्ञान दिनविशेष


★२२ जून १८६४ : लिथुआनिया देशातील प्रख्यात शास्त्रज्ञ हर्मन मिन्कोवस्की यांचा जन्म. यांनी चतुर्मिती विश्वाची अभिनव संकल्पना मांडली. (मृत्यू १२ जून)

 ★१९०६ : जर्मन प्राणिशास्त्रज्ञ फ्रिटझ रिचर्ड शॉडिन यांचे निधन. सन १९०५ मध्ये उपदंश निर्माण करणाऱ्या (स्पायरोच्छाईश पॅलिडा) चा शोध लावला. तसेच ट्रायसॅनोसोम्स संबधी महत्त्वाचे संशोधन केले. (जन्म: १९ सप्टेंबर)

 ★१९४० : रशियन हवामान शास्त्रज्ञ ब्लाडियार पी कोलेन यांचे निधन. यांनी सूर्यावरील उष्णता व पावसाचा वर्षाव यांच्या संबंधी दीर्घ संशोधन केले. हवामान शास्त्रातील एक शास्त्रज्ञ म्हणून यांचा लौकिक आहे.

★१९१० व्यापारी तत्त्वावरील प्रवाशांची पहिली वाहतूक सुरु झाली. कॉऊंट फॉन झेपेलीन यांनी वीस प्रवाशांना सोबत घेऊन हवाई जहाजाचे स्वतः संचालन केले. 

★१९९९ इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्त्रो) ने नॅशनल कॉंसिल ऑफ सायन्स म्युझियमच्या सहकार्याने अवकाश विज्ञान व तंत्रज्ञाना विषयीचे हायटेक अवकाश संग्रहालय बनविण्याची योजना सुरु केली. 

★१९९९ चायनीज अॅकडेमी ऑफ सायन्सने 'पांडा' या दुर्मिळ प्राण्याचे क्लोनिंग करण्याचे निश्चित केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा