epranali

This is educational blog.

Res

Breaking news

सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

मंगलमय चरणि तुझ्या

 मंगलमय चरणि तुझ्या 



 मंगलमय चरणि तुझ्या विनंति हीच देवा।।धृ।।

 आठव तव नित्य असो, हृदयी गुरू वचन ठसो, 

शुभ विचार मनि विलसे, जो अमोल ठेवा ॥१॥ 

देशावरी प्रेम करू, कर्तव्य नच विसरू, 

सत्कार्या पुढति सरू, वर असाचि द्यावा ॥२॥ 

 - - कर्वी तांबे 

********************************


अता वंदितो मी 

अता वंदितो मी गुरु माऊलीला । 

अति आदरे मी नमि या पदाला ॥

 कृपेने जिच्या जीवन अर्थ आला । 

सदाचार माझा सखा नित्य झाला ॥ 

जनी हीन दीना मी देईन हात । 

वृद्धी, अपंगा मी देईन साथ ।।

कृती होऊ दे नित्य वाणीनुसार 

व्हावे सदा चित्त निर्मल विशाल ॥ 

*******************************


नमो भास्करा 

नमो भास्करा, दे अनोखा प्रकाश । 

तनूचा, मनाचा कराया विकास ॥

 गतीच्या विकासास द्यावा प्रकाश । 

झणी होऊ दे दुर्गुणांचा विनाश ॥ 

नमो विद्यादेवता, मी तुझा नम्र दास ।

 अशी बुध्दि देई, मला तूचि खास ॥ 

घडो मायभूची अहर्निश सेवा । मनाला अहंकार, कधि ना शिवावा ।।

********************************

          प्रार्थना

सर्वेपि सुखिनः सन्तु । सर्वे सन्तु निरामयाः । 

सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चिद् दुःखमाप्नुयात् ॥

 सर्वेषा स्वस्तिर्भवतु । सर्वेषां शांतिर्भवतु ॥ 

सर्वेषां पूर्ण भवतु । सर्वेषां मंगलं भवतु ॥

  ॐ पूर्णमदः पूर्णमदं पूर्णात् पूर्णमुदच्यते ।

 पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥ 

 ॐ सहनाववतु । सहनी भुनक्तु ।।

 सहवीर्य करवावहै । तेजस्वीनीवधीतमस्तु ॥ 

मा विद्वषावहै । 

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा