epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शनिवार, २० ऑगस्ट, २०२२

एका दलिताचे / अस्पृश्याचे मनोगत

                          एका दलिताचे / अस्पृश्याचे मनोगत 

                   गतकाळाची झाली होळी, धरा उद्याची उंच गुढी पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी अशा नव्या पिढीतला मी दलित आहे. 

                  अजूनही शिळ्या कढीला ऊत आणणाऱ्या प्रस्थापितांचा मला ध्वंस करायचा आहे. पण यासाठी आमच्या पूर्वजांना पाणवठयावर पाणी भरायला तेव्हा मनाई होती, देवळात जायला बंदी होती, आमची सावलीदेखील अपवित्र मानायची प्रथा होती इत्यादी भूतकाळातील गोष्टी आजही परत चवीने सांगण्यात मला रस नाही. तो इतिहास इतिहासजमा करायचा. वर्तमानाचा विचार आणि भविष्याचा वेध हेच महत्त्वाचे. 

                   महानुभावपंथाच्या इतिहासात घडलेली ही घटना आहे. एक दिवस दलित कोथळोबा उमाइसाच्या करवतीचे पाणी प्यायला. तो आणि उमाईसा दोघेही श्री चक्रधरस्वामींचे शिष्य होते. पण ब्राहमण उमाईसा कोथळोबावर रागावली. कारण तिच्या मनात स्पृश्यास्पृश्य भेद होता. महानुभावपंथाला हा भेद मान्य नाही. म्हाइंभटांनी याबद्दल तिला दोष दिला. तिची चूक तिला समजली. तिने कोथळोबाला दंडवत घातला. उमाइसा बदलली पण बाकीचे जग? ते प्रस्थापिताचीच पूजा करत आहे. 

                   सर्वच क्षेत्रात प्रस्थापित आहेत. तेच नवविचारांना आणि नव्या समताधिष्ठित समाजरचनेला विरोध करतात. प्रस्थापितांची काठी सतत आपल्या पाठीवर उगारुन आहे. ती अनादिकाळापासून चालत आलेली आहे. तिच्या भयामुळे आपण सगळे जनावरासारखे खाली मान घालून दिशाहीन धावत आहोत. आपलेच पाय आपल्या पायात अडकत आहेत. मला ही काठीच तोडून फेकायची आहे.

                  यासाठी मला या नव्या पिढीत नवा विश्वास जागवायचा आहे. प्रथम त्यांच्या डोळ्यातील वाळवंट मला पुसून टाकायला हवे आहे. तिथं नवप्रेरणांच्या तेजस्वी बहरकळ्या पेराव्या लागणार आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील भयग्रस्त अंधार धुवून टाकायचा आहे. त्यांचे कोंडलेले मुक्त करायचे आहेत त्यांच्यात आत्मविश्वास जागृत होईल. आणि डॉ. बाबासा आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे आत्मविश्वासासारखी दुसरी देवी शक्ती नाही. कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या उणठणीत दंड थोपटण्याने गर्भगळित झाल्यास त्याच्या हातून काहीही होणे शक्य नाही. श्वास.              

                         प्रस्थापितांचा विध्वंस तर करायचा पण नवे काय घडवायचे? मला विश्वबंधुत्व घडवायचे आहे. मी ना कुठल्या धर्माचा, ना कुठल्या पंथाचा, ना कुठल्या जातीचा. मानवता हाच माझा धर्म, विश्वातील सारे मानव माझे बांधव हाच माझा पंथ आणि मनुष्य हीच माझी जात. जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुगा माझ्या घरच्या मजला दिसताहेत. 

                        हे घडवून आणायला मी नवी पिढी संस्कारित करणार आहे. पहिला संस्कार निर्भयतेचा आम्हाला उगीचच मृत्यूची भीती वाटते, मृत्यू अटळ आहे हे माहीत असून देखील तशीच आम्हाला प्रस्थापित समाजाची भीती वाटते, जुने नष्ट होऊन नवे निर्माण होणार हा निसर्गाचाच नियम आहे हे ठाऊक असून. असेल हिमत लढणारांची आणि सुळावर चढणारांची निर्भय निधड्या छातीवरती जुलूम रगडित जाणारांची अशी पिढी मला घडवायची आहे.

                       आमची पिढी विज्ञानयुगातली आहे, तरी अंधश्रद्धा चालूच आहेत. भारत एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत आहे, तरी युरिया, स्वाला, झामुमो, शेअर घोटाळे, बोफोर्स, अशी प्रकरणे रोजरोज उपडकीला घेऊन प्रतिष्ठित भारतीय नागरिक नव्या पिढीला अनीतीचे बाळकडू पाजत आहेत. यातून मुक्त असा भारत मला निर्माण करायचा आहे. आणि मला बजावून सांगायचं आहे. तातील लेखणीच्या बंदुकांना ठेवतील काळोखावर डागण्यासाठी. आमचे बलदंड बाहू पृथ्वीगोल सहज उचलून धरतील बुडताना वाचवण्यासाठी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा