epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

आपला देश

                 आपला देश 

              (Our Country) 

           भारत ही माझी मातृभूमी आहे. भारत हा एक महान देश तसेच जगातल्या प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. भारत हा धर्माच्या, संस्कृतिच्या आणि विचारधारेच्या वैविध्यासाठी ओळखला जातो. तसाच तो त्याच्या आध्यात्मिक दृष्टीसाठी आणि सगळ्या संस्कृती स्किकारण्यासाठी ओळखला जातो. हिमालय पर्वत हा भारताच्या उत्तरेला वसलेला आहे. जगातील सर्वात उंच शिखर असलेले माऊंट एवरेस्ट हे हिमालयीन पर्वतांचाच एक भाग आहे. गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू सारख्या अनेक नद्यांचा उगम हिमालयात झाला आहे.

थरचे वाळवंट हे राजस्थान या पश्चिमी राज्यात आहे तर कन्याकुमारी हे भारताचे दक्षिणेकडचे टोक आहे. भारताला पूर्व आणि पश्चिम असे दोन समुद्रकिनारे लाभलेले आहेत. भारत हा पश्चिमेला अरबी समुद्राने तर पूर्वेला बंगालच्या उपसागराने वेढला आहे. तर हिंद महासागर हा भारताच्या दक्षिणेला आहे. भारत हा जगातील सातवा मोठा देश आहे आणि तो लोकसंख्येने गजबजलेला आहे. भारतातील बहुसंख्य लोक हे खेड्यात राहतात. विविध धर्माचे लोक जसे की हिंदू, खिश्चन, पारशी, ज्यू, जैन आणि मुस्लिम हे भारताच्या लोकसंख्येचा भाग आहेत. भारत हा शिल्पकला आणि स्थापत्यकलेसाठी सुप्रसिद्ध आहे. जगभरातील पर्यटक ताजमहल, दक्षिण भारतातील मंदिरे आणि वेरूळ-अजिंठाच्या लेणी पाहण्यास भारतात येतात. स्वामी विवेकानंद, बुद्ध, महावीर, शिवाजी महाराज, महात्मा गांधी अशा वैचारिक महापुरुषांच्या व्यक्तिमत्त्वांचे जन्मस्थान आहे. भारत ही जगातील चौथी मोठी लष्करी शक्ती आहे. भारत एक सार्वभौम, धर्मनिरपेक्ष आणि स्वतंत्र देश आहे. जगातील अनेक आघाडीचे तंत्रज्ञ, वैज्ञानिक आणि लेखक हे भारतीय आहेत. भारत हा नेहमी समानतेसाठी आणि सहिष्णुतेसाठी आग्रही राहिला आहे. माझ्या मते भारत हा सर्वोत्तम देश आहे आणि मी माझ्या देशावर प्रेम करतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा