epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

माझे आजी-आजोबा

    माझे आजी-आजोबा 

  (My Grandparents) 



             मी एक संयुक्त कुटुंबात राहतो. माझे आजी-आजोबा पण आमच्या सोबतच राहतात. ते माझ्या वडिलांचे पालक आहेत. आजी-आजोबा हे आमच्या कुटुंबाचे आधार आहेत. ते मला आधार देतात, मार्गदर्शन करतात आणि प्रेमही देतात. माझे आजोबा हे उंच आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. ते ७० वर्षांचे आहे. ते अजूनही मजबूत आणि तंदुरुस्त आहेत. ते सैन्यामध्ये रेजिमेन्ट अधिकारी (कर्नल) होते. आता निवृत्त आहेत आणि आमच्यासोबत राहतात. ते सकाळी लवकर उठतात. मग आम्ही सोबत फिरायला जातो. त्यांना वर्तमानपत्र वाचायला आवडते. त्यांच्याकडे खूप सारी मासिके आणि पुस्तके आहेत.

माझी आजी ६५ वर्षांची आहे. तिचे केस काळे अन् तपकिरी आहे. तिचा चेहरा थोडासा थकलेला अन् सुरकुत्या पडलेला आहे. ती शिक्षिका होती तिला एक साधी आणि नेहमीची सवय आहे ती रोज सकाळी लवकर उठते, अघोळ करते आणि त्यानंतर उपासना, चिंतन आणि प्रार्थना करते तसेच ती माझ्या आईला कामात मदतही करते. माझी आजी-आजोबा मला अभ्यासामध्ये मदत करतात आणि रंजक गोष्टीही सांगतात आम्ही रोज संध्याकाळी एकत्र जमतो आणि लक्षपूर्वक त्यांच्या गोष्टी ऐकतो. काही वेळा मी त्याच्याकडून ह्याही गोष्टी ऐकतो की, माझे वडील लहानपणी कसे होते. माझे आजी आजोबा माझ्यासोबत बराच वेळ घालवतात. माझा वेळ त्यांच्या सहवासात कसा जातो ते मला कळतही नाही. माझी आजी आजोबा नेहमी दुसऱ्यांना संकटात मदत करतात दुसरे कोणी त्याच्याकडे मदत मागायला आले तर ते कधीच का कू करत नाही. ते उदार मनाचे आहे ते मला नेहमी नवीन गोष्टी शिकवतात आणि आतातर मी त्यांना कॉम्प्युटर कसे चालवायचे ते शिकवतोय. माझे आजी आजोबा दयाळू सभ्य आणि प्रेमळ आहे आणि सर्व त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांचा आदर करतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा