epranali

This is educational blog.

Res

Breaking news

सोमवार, १६ मे, २०२२

दिवा पाहुनि लक्ष्मी येते

 दिवा पाहुनि लक्ष्मी येते

 करु तिची प्रार्थना, 

 शुभंकरोति म्हणा, मुलांनो, 

शुभंकरोति म्हणा ॥ 

शुंभकरोति कल्याणम्,

 शुभंकरोति कल्याणम् ॥१॥

 जेथे ज्योती तेथे लक्ष्मी 

उभी जगाच्या सेवाधर्मी 

दिशा दिशांतुनि या लक्ष्मीच्या

 दिसती पाऊलखुणा -

 शुभंकरोति म्हणा, मुलांनो, ॥२॥ 

या ज्योतीने सरे आपदा

 आरोग्यासह मिळे संपदा 

शत्रुबुद्धिचा विनाश होता 

सौख्य मिळे जीवना-

 शुभंकरोति म्हणा, मुलांनो..... ,....॥३॥

 दिव्या दिव्या रे दीपत्कार कानीं कुंडल मोतिहार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा