epranali

This is educational blog.

Res

Breaking news

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

पूरग्रस्त भागास भेट

    पूरग्रस्त भागास भेट 



(Visit to a Flood- Affected Area)                   मागील वर्षी पावसाळ्यात आमच्या जिल्ह्यात धुवाधार वर्षा झाली. सगळ्यात जास्त हानी कशाची झाली असेल तर ती 'निरा' नदीच्या काठावर वसलेल्या 'मूलगाव' या खेड्याची. "आमच्या गावात एक सामाजिक कार्य करणारे मंडळ आहे, आम्ही पूरग्रस्त भागाला भेट देण्याचे ठरविले. मदतकार्य आणि पुनर्वसनाच्या कार्यात स्वयंसेवक म्हणून तेथे गेलो. आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा तेथीर पूरग्रस्त भागातील चित्र अतिशय केविलवाणे होते. पूर ओसरला होता; पण सर्वत्र घाणीचे साम्राज्य होते. छोट्या झोपड्या आणि जनावरे वाहून गेली होती. जीव वाचविण्यासाठी आपल्या घराच्या छपरावर चढून बसलेल्या माणसांना खाली उतरण्याची हिंमत होत नव्हती. आम्ही अशा बऱ्याच जणांची सुटका केली आणि त्यांना सुरक्षित स्थळी हालविले.

शेते अजूनही पाण्याखालीच होती. पुरामुळे उभे पीक जमीनदोस्त झाले होते आणि शेतकऱ्यांनी त्यांची घरे, गुरे, पीक-सारेच गमावले होते. पाणी घरात तथा दुकानांमध्येही शिरले होते. दुकानातील धान्य, किराणा (जीवनावश्यक वस्तू) आणि इतर वस्तू मातीमोल झाल्या होत्या. `हजारो नागरिक पुरामुळे बेहाल झाले होते. सरकारने सहायक मदत कार्याची, योजनांची अंमलबजावणीदेखील सुरू केली होती. अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तू, तसेच पुन्हा नव्याने आयुष्य उभे करण्यासाठी त्यांना मदत करण्यात येत होती. आमच्या शाळेतील मुलानी पैसे व कपडे देण्याचे ठरवले. आमच्या परीने आम्ही त्या पूरग्रस्तांना हरप्रकारे मदत करत होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा