epranali

This is educational blog.

Res

Breaking news

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

आजच्या काळातील संगणक

 आजच्या काळातील संगणक 



(Computers in Today's World) 

         आजच्या युगात संगणकीय उद्योग व्यवसाय हा सर्वांत भरभराटीला आलेला उद्योग आहे. कॉम्प्युटरसाठी लागणारे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांच्यामध्ये सतत सुधारणा होत आहे. संगणकीय तंत्रज्ञानामध्ये वायूच्या वेगाने प्रगती होत आहे. भरपूर कामे पार पाडणारे संगणक म्हणजे एक अत्यंत सुधारित अशा प्रकारचे यंत्र आहे. खूप लोकांना खूप वेळ करावे लागणारे काम संगणकाद्वारे काही मिनिटांतच पूर्ण केल्या जाऊ शकते, परंतु संगणकाद्वारे काम करवून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला संगणकासमोर बसून तशा सूचना द्याव्या लागतात. त्यामुळेच संगणक त्याची कामे पूर्ण करण्यासाठी माणसावर अवलंबून असतो. आजकाल आपली सर्व कामे इतकी संगणकप्रधान झालेली आहेत की, जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला संगणक वापरावा लागतो. कुठलेही काम करताना, कुठेही गेलो असताना प्रत्येक काम हे आपल्याला संगणकीकृत झालेले दिसते.

खाद्यपदार्थ मागवण्यापासून ते जगातल्या दुसऱ्या भागात वसलेल्या व्यक्तीशी बोलण्यापर्यंत सर्व कामे संगणकाद्वारे केली जातात. इंटरनेटच्या साहाय्याने तर संगणकाने जग छोटे बनवले आहे. इंटरनेट आणि संगणकामुळे प्रत्येक जण घरबसल्या बिल भरणे, खरेदी, संपर्क, वाचन, अर्ज भरणे आणि अशा प्रत्येक गोष्टी करू शकतो. संगणकाने निश्चितच आपले आयुष्य सोपे आणि आरामदायी केले आहे. तेही कमी मनुष्यबळासहित संगणकीकरणामुळे वेळेआधीच निवृत्ती आणि बेरोजगारी यात प्रचंड वाढ झाली आहे. तसेच त्यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न उद्भवले आहेत. आज सर्व लोक त्यांचा जवळजवळ सर्व वेळ संगणकावर काम करण्यासाठी अथवा इतर गोष्टींसाठी खर्च करतात. त्यामुळे लोक आळशी झाले आहेत. त्यामुळे संगणक हा सुवर्णमध्य साधून वापरणे गरजेचे झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा