epranali

This is educational blog.

Res

Breaking news

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

वस्तुसंग्रहालयास भेट

      वस्तुसंग्रहालयास भेट


 

(A Visit to the Museum)

           मागच्या आठवड्यात आमच्या वर्गाला वस्तुसंग्रहालयाला भेट देण्यास नेण्यात आले होते. आम्ही तेथे आमच्या इतिहासाच्या शिक्षकांबरोबर गेलो होतो. वस्तुसंग्रहालयात मांडलेल्या कलात्मक वस्तू बघण्यास आम्हाला तीन तास लागले वस्तुसंग्रहालयात दुर्मीळ चित्रे, मातीची भांडी, कलात्मक वस्तू आणि शिलालेख हस्तलिखिते होती. आम्ही सर्वप्रथम शस्त्रास्त्र विभागाला भेट दिली मांडलेली शस्त्रास्त्रे ही प्राचीन अश्मयुगापासून ते ब्रिटिशांच्या राज्यापर्यंतची होती. तेथे राजे. ब्रिटिश अधिकारी आणि जवान यांनी वापरलेल्या तलवारी, सुरे आणि बंदुका होत्या. तेथे दगडी हत्यारे, धनुष्यबाण, ढाली, चिलखते आणि तोफासुद्धा होत्या. आम्हाला माणसाने बनवलेल्या संहारी शस्त्रांच्या प्रगतीची जाणीव झाली.

वस्तुसंग्रहालयाच्या दुसऱ्या दालनात विविध भ्रुसा भरलेले प्राणी होते. ते इतके कलात्मकरीत्या बनविले होते की, ते जिवंत भासत होते. त्यातील बहुतेक ● प्राणी आता नामशेष झालेले आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. वस्तुसंग्रहालयातील कलादालन हे सर्व दालनांमध्ये सुंदर दालन होते. तेथे काही प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे लावली होती. मातीची आणि धातूंची भांडी जी भारताच्या इतिहासातील वेगवेगळ्या काळात वापरल्या जात होती. तीही दिसत होती. कलाकारांची कला ही ब्रास, धातू काम, मातीची भांडी आणि लाकडाच्या वस्तूंमधून दिसत होती. तेथे संस्कृत भाषेतील प्राचीन हस्तलिखितसुद्धा होते. आम्ही वस्तुसंग्रहालयातील त्या कलात्मक वस्तू बघण्यात इतके दंग झालो की, वेळ कसा गेला ते कळलेच नाही. सर्वच वस्तू छान होत्या वस्तुसंग्रहालयाला दिलेली भेट ही अनेक अर्थानी फलदायी ठरली. त्या भेटीने आमच्या इतिहास कला, साहित्य आणि विज्ञानाच्या ज्ञानात मोलाची भर घातला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा