विज्ञान कोडी
वाढीसाठी करतो मदत
काढतो शरीराची झीज भरून
पोषकतत्वाचा प्रकार मी
सांगा नाव हात वर करून
ओळखा बर!
-प्रथिने
गरज भागवितो उर्जेची
पोषकतत्वात माझा मान
तृणधान्ये असुद्या आहारात आहे
पोळी-भाकरीत माझे प्रमाण
ओळखा बर!
-कर्बोदके
अस्थिभंग कोठे झाला
ते कळते अगदी क्षणात
रॉन्टजेन यांचा शोध आहे
का उत्तर मनात ?
ओळखा बर!
-क्ष-किरण प्रतिमा
हृदय, फुफ्फुसे व इतर अवयव
यांचा आहे संरक्षक खरा
बरगड्यांपासून तयार होतो
असा कोणता पिंजरा
ओळखा बर!
- छातीचा पिंजरा
सजीवाांच्या श्वसनासाठी
उपयोगी असा मी वायू
ज्वलनासाठी मदत करतो
म्हणतात मला प्राणवायू
ओळखा बर!
- ऑक्सिजन
वनस्पतींचा आकर्षक भाग
बघता प्रफुल्लीत होते मन
विविध रंग व विविध आकार
पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन
ओळखा बरं
फुल
सजीवांचे एक लक्षण
आत बाहेर होतात वायू
क्रिया आहे महत्वाची
कोण लवकर ओळखते पाहू
ओळखा बरं
श्वसनक्रिया
धरून ठेवतो घट्ट माती
आधार देतो झाडाला
पाणी आणि पोषक तत्वे
मदत करतो यांच्या वहनाला
ओळखा बरं
मूळ
होते माझी निर्मिती सजीवाचे विघटन झाले तर
ह्युमस माझे दुसरे नाव
परिपक्व मृदेतील वरचा थर
ओळखा बरं
कृथित मृदा
दूषित झाल्याने वातावरण
होतात त्रस्त सारेजण
सांगा पाहू मित्रांनो हे कोणते प्रदूषण
ओळखा बरं
वायू प्रदूषण
उत्सर्ग बाहेर टाकण्याची क्रिया घडते
विशिष्ट अवयवांनी शरीराचे आहे लक्षण
सांगा बरं सर्वांनी
उत्सर्जन क्रिया
सूर्याची अतिनील किरणे
शोषून घेणे हे माझे काम खास
क्लोरो फ्लोरो कार्बन आणि कार्बन टेट्राक्लोराईड मुळे
होतो माझा नाश
ओळखा बरं
ओझोन वायू
पाणीच पाणी दोन्ही थडी
कधी जातो जीव तर कधी जाते संपत्ती
नाव घेताच धडकी भरते
कोणती आहे आपत्ती
ओळखा बरं
महापूर
मानवनिर्मित आहे धागा
मजबूत व चकाकी फार
कृत्रिम रेशीम दुसरे नाव
सूर्यकिरण हा सारखा चमकदार
ओळखा बरं
रेयॉन
सफरचंद झाडावरून पडतो खाली
यातून काय मिळतो बोध
बलाचाच हा प्रकार आहे
न्यूटन यांनी लावला शोध
ओळखा बर!
- गुरुत्वीय बल
जवळ नेले चुंबक जर
तर आकर्षन घेतला खिळा
बल कोणते इथे लागले
सांग लवकर बाळा
ओळखा बर!
- चुंबकीय बल
हवेत जर टांगला तर
उत्तर-दक्षिण स्थिर राहतो
होकायंत्रात वापर करून
आपण सर्व दिशा पाहतो
ओळखा बर!
-चुंबक
पाय घसरून केव्हा पडतो
आता माझ्या लक्षात आले
याच बलामुळे मित्रांनो
जमिनीवरून चालणे शक्य झाले
ओळखा बर!
- घर्षण बल
आधाराभोवती हलणारा
न वाकणार मोठा दांडा
भार-बल-टेक हे तीन भाग
साधे यंत्र कोणते उत्तर सांगा ?
ओळखा बर!
-तरफ
शास्त्रीय भाषेत आवाजाला
आपण म्हणतो ध्वनी
तीव्रता मोजण्याचे एकक
काय सांगू शकाल का कोणी?
ओळखा बर!
- डेसिबल
कडी आहे भोवती
घनता याची फार कमी
असा हा वैशिष्ट्यपूर्ण ग्रह
सांगू शकाल का नाव तुम्ही ?
ओळखा बर!
-शनी ग्रह
आवाज ऐकतो गांडूळाचा
देऊन नीट हा लक्ष
संवेदनक्षम श्रवणेन्द्रीय असा पक्षी
मिळविते त्याचे भक्ष
ओळखा बर!
-रॉबीन, वूडकॉक
सूर्याच्या सर्वात जवळ
असे सूर्यमालेत त्याचे स्थान
सकाळी आणि संध्याकाळी दिसतो
असा ग्रह सर्वात वेगवान
ओळखा बर!
- बुध ग्रह
म्हणतात मला निळा ग्रह
सूर्यमालेत माझे तिसरे स्थान
भोवती माझ्या चुंबकीय क्षेत्र आणि
जीवसृष्टी असण्याचा मान
ओळखा बर!
- पृथ्वी ग्रह
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह
फिरतो स्वतः भोवती वेगाने
वादळी ग्रह हे टोपण नाव
मूळ नाव सांगा प्रेमाने
ओळखा बर!
-गुरु ग्रह
स्वतः फिरतो पूर्वेकडून पश्चिमेकडे
सर्वात तेजस्वी आणि तप्त
सूर्यमालेतील हा आहे ग्रह
नाव सांगा फक्त
ओळखा बर!
-शुक्र ग्रह
सूर्यमालेतील चवथे स्थान
ऑलिम्पस मॉन्स या पर्वतासह
आहे लोहमिश्रित लालसर माती
म्हणून म्हणतात याला लाल्ग्रह
ओळखा बर!
-मंगळ ग्रह
दोन उतरणी जोडल्या असता
बनले धारदार अवजार
दोन तुकडे होतात वस्तूंचे
जर केला या साध्या यंत्राने वार
ओळखा बर!
-पाचर
प्रकाश मिळतो ज्यांपासून
उष्णतेचा स्रोत खरा
सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे
असा कोणता तारा
ओळखा बर!
-सूर्य
मी आहे अपृष्ठवंशीय प्राणी
पाठीचा कणा मला नाय
पावसाळ्यात देतो दर्शन
खूप सारे मला पाय
ओळखा बर!
-गोगलगाय
रबर आणि गंधक मिश्रण
उष्णतेने टणक झाले रबर
व्हल्कनायझेशन पद्धती
ही कुणी शोध लावला बरं ?
ओळखा बर!
- चार्ल्स गुडईयर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा