epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

तू नव्या जगाची आशा

         तू नव्या जगाची आशा 



तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा ।। धृ ।।

तपोवनातून तुझ्या उजळती, उपनिषदांच्या वाणी

 माती मधून तुझ्या जन्मल्या, नररत्नांच्या खाणी 

जय युग धैर्याच्या देशा, जय नव सूर्याच्या देशा 

तू नव्या जगाची आशा ॥ १ ॥ 

बळा पुढे वा छळापुढे नच इथे वाकल्या माना 

अन्यायाला भरे कापरे, बघुनि शूर अभिमाना

 जय आत्मशक्तीच्या देशा, जय त्याग भक्तिच्या देशा 

तू नव्या जगाची आशा ॥ २ ॥ 

श्रमातूनी पिकलेली शेती, पहा डोलती धुंद 

थेंबातुनी सांडे, ह्रदयातील आनंद 

जय हरित क्रांतिच्या देशा, जय विश्व शांतीच्या देशा

 तू नव्या जगाची आशा ॥ ३ ॥ 

पहा झोपड्या कंगालाच्या, थरथत्या भोवताली 

अन्यायाला जाळीत उठल्या, झळकत लाख मशाली 

जय लोकाशक्तीच्या देशा, जय दलित मुक्तीच्या देशा तू नव्या जगाची आशा ॥ ४ ॥ 

मंगेश पाडगांवकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा